रशियाला बसला जोरदार झटका..! ब्रिटेनच्या निर्णयामुळे होणार तब्बल 1.75 लाख कोटींचे नुकसान; पहा, काय आहे प्रकार..
दिल्ली : रशिया-युक्रेन संकटामुळे (Russia-Ukraine War) अमेरिका आणि युरोपसह संपूर्ण जग अस्वस्थ आहे. रशियावर आर्थिक निर्बंध लादले जात आहेत. शनिवारी, रशियाला SWIFT आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी बंदी घालण्यात आली. या संदर्भात ब्रिटिश मल्टी नॅशनल ऑइल अँड गॅस कंपनीने (BP) मोठा निर्णय घेतला आहे. रशियातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी मालकीची कंपनी असलेल्या Rosneft मधील आपला संपूर्ण हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. तेल आणि वायू क्षेत्रातील प्रमुख BP ची Rosneft मध्ये 19.75 टक्के हिस्सेदारी आहे, जी त्यांना पूर्णपणे विकायची आहे. असे मानले जाते की त्याचे मूल्यांकन सुमारे $ 25 अब्ज म्हणजेच 1.75 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. कंपनीने 2013 मध्ये रोझनेफ्टमधील भागभांडवल विकत घेतले होते.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीचे मुख्य कार्यकारी बर्नार्ड लूनी आणि माजी संचालक बॉब डडले Rosneft च्या बोर्डाचा राजीनामा देतील. या निर्णयाबाबत लुनी म्हणाले की, रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्याने आम्ही दुखावलो आहोत. त्यामुळेच आम्ही Rosneft बरोबर व्यापार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटिश मल्टी नॅशनल ऑइल अँड गॅस कंपनी हा रशियाचा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे. BP ने घेतलेल्या या निर्णयानंतर आता सर्वांच्या नजरा इतर युरोपियन कंपन्यांवर आहेत ज्यांचा व्यवसाय रशियात आहे. टोटल एनर्जी (TTEF) आणि ब्रिटिश शेल (SHEL) या फ्रेंच कंपन्यांची रशियामध्ये मोठी गुंतवणूक आहे. रशियामध्ये काम करण्यासाठी तेथील कंपन्यांवर पाश्चात्य देशांच्या सरकारचाही सतत दबाव असतो.
कंपनीच्या निर्णयावर Rosneft म्हणाले की, ब्रिटीश सरकारने कंपनीवर राजकीय दबाव टाकला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे 30 वर्षांचे सहकार्य आता संपुष्टात आले आहे. या कंपनीच्या कमाईत Rosneft चा मोठा वाटा आहे. 2021 मध्ये, Rosneft ने BP ला $640 दशलक्ष लाभांश जारी केला, जो त्याच्या एकूण रोख प्रवाहाच्या 3 टक्के होता.
रशियामध्ये अनेक युरोपीय कंपन्यांचा मोठा व्यवसाय आहे. फ्रेंच तेल कंपनी टोटल एनर्जीचा नोवाटेकमध्ये 19.4 टक्के हिस्सा आहे, तर यमल एलएनजी प्रकल्पात 20 टक्के हिस्सा आहे. नोवाटेक ही रशियाची दुसरी सर्वात मोठी नैसर्गिक वायू उत्पादक कंपनी आहे. तसेच, गॅस उत्पादनाच्या प्रमाणात ही जगातील सातवी सर्वात मोठी कंपनी आहे.
रशियाने ब्रिटेनलाही दिलेय जशास तसे उत्तर..! पहा, कशामुळे रशिया संतापलाय ब्रिटेनवर..?