Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युक्रेन संकटात युरोपीय देश आलेत ताळ्यावर; जर्मनी ‘त्यासाठी’ करणार कोट्यावधींचा खर्च.. पहा, काय आहे प्रकरण..?

दिल्ली : युक्रेनच्या संकटाच्या (Russia-Ukraine War) वेळी जर्मनीने स्वतःसाठी 100 अब्ज युरोचा विशेष संरक्षण निधी तयार करण्याची घोषणा केली आहे. जर्मनी आणि युरोपीय देश दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच त्यांच्या संरक्षण धोरणात मोठे बदल करत आहेत. जर्मनीने विशेष सशस्त्र सेना निधीसाठी 100 अब्ज युरो खर्च करण्याची घोषणा केली आहे. युक्रेन संकटाच्या काळात या विशेष घोषणेमध्ये जर्मनीने आपला संरक्षण खर्च जीडीपीच्या दोन टक्क्यांपेक्षा जास्त ठेवण्याचेही म्हटले आहे.

Advertisement

अमेरिका ही मागणी अनेक दिवसांपासून करत आहे. गेल्या अनेक दशकांतील युरोपीयन सुरक्षा धोरणातील हा सर्वात मोठा बदल आहे. रशियाने युक्रेनवर केलेला हमला हे त्याचे कारण असल्याचे मानले जात आहे. युक्रेन संकटाने युरोपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवण्याच्या निर्णयानंतर काही तासांनंतरच जर्मन चान्सलर यांनी ही घोषणा केली.

Advertisement

युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा दुसऱ्या महायुद्धानंतर (Second World War) युरोपमधील सुरक्षा धोरणावर कसा परिणाम झाला हे यावरून दिसून येते. ही घोषणा अशा वेळी आली आहे जेव्हा इस्रायलने युद्ध थांबवण्याबाबत चर्चेसाठी मध्यस्थ म्हणून तयार असल्याचे म्हटले आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी आपले चांगले संबंध असल्याचे इस्त्रायलने सांगितले.

Advertisement

दुसरीकडे युद्ध संपवण्यासाठी युरोपातील शहरांमध्ये जोरदार निदर्शने सुरू आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये पहिल्यांदाच इतके मोठे युद्ध उभे राहिले आहे. युक्रेनच्या समर्थनार्थ आणि पुतिन यांच्या विरोधात घोषणा देत हजारो लोकांनी जर्मनीची राजधानी बर्लिन शहरात जोरदार आंदोलन केले.

Loading...
Advertisement

संरक्षण निधीवर पुरेसा खर्च न केल्याबद्दल अमेरिका आणि इतर नाटो (NATO) सहकारी देशांनी सातत्याने जर्मनीवर टीका केली आहे. नाटो सदस्यांनी त्यांच्या जीडीपीच्या 2 टक्के संरक्षणावर खर्च करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, जर्मनीने सातत्याने यापेक्षा अत्यंत कमी खर्च केला आहे. बर्लिनमधील संसदेच्या विशेष अधिवेशनात जर्मनीचे चान्सलर ओलाफ शॉल्त्स यांनी सांगितले की, “आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला आपल्या देशाच्या सुरक्षेमध्ये अधिक गुंतवणूक करावी लागेल हे स्पष्ट आहे.”

Advertisement

सध्या जर्मनीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. जर्मन सैन्याच्या आधुनिकीकरणाचे काम गेल्या काही वर्षांत देशाच्या इतर देशांच्या तुलनेत अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. जर्मनीही आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या लष्करावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. तथापि, महायुद्धांनंतर युरोपमध्ये शांततेसाठी वचनबद्ध असलेल्या या देशांनी आणि विशेषतः जर्मनीने त्यांच्या अजेंडातून युद्धाला शक्य तितके दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्यामुळे या देशांना संरक्षण धोरण बदलण्यास भाग पाडले आहे. 100 अब्ज युरोचा निधी सध्या 2022 साठी एकवेळ असेल असे शॉल्त्स यांनी म्हटले आहे. येत्या काही वर्षांसाठी याच पद्धतीने निधी दिला जाईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर्मनी आपल्या जीडीपीच्या 2 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रक्कम संरक्षणावर खर्च करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात जर्मनीचा संरक्षण खर्च वाढणार हे उघड आहे.

Advertisement

Russia-Ukraine War : रशियाच्या विरोधात जर्मनी युक्रेनला देणार ‘ही’ मदत; पहा, काय आहे नवा प्लान..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply