Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एक हजार रुपयांपेक्षा स्वस्त आहेत ‘हे’ 3 ब्रॉडबँड प्लान; जबरदस्त इंटरनेट स्पीड, डेटाचेही टेन्शन नाही..

मुंबई : कोविड-19 (Covid-19)साथीच्या आजारामुळे इंटरनेट वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्क फ्रॉम होम असो, अभ्यास करणे असो यासाठी घरी हाय-स्पीड ब्रॉडबँड कनेक्शन असणे आवश्यक आहे. अनेक कंपन्या देशभर अमर्यादित ब्रॉडबँड योजना ऑफर करत आहेत. यामध्ये एअरटेलचाही समावेश आहे, जो अतिशय स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करत आहे. कंपनीकडे कोणत्या ब्रॉडबँड योजना आहेत आणि तुम्हाला कोणता प्लान फायदेशीर ठरू शकतो, याबाबत माहिती घेऊ या..

Advertisement

एअरटेल बेसिक ब्रॉडबँड प्लॅनची ​​किंमत 499 रुपये प्रति महिना आहे, जी 40 Mbps पर्यंत स्पीड ऑफर करते. या प्लॅनमध्ये काही एअरटेल थँक्स (Airtel Thanks) अॅप फायदे देखील समाविष्ट आहेत जसे की विंक (wynk) अॅप एक वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये 3.3TB मासिक डेटा मिळतो.

Advertisement

799 रुपयांचा ब्रॉडबँड प्लान
या स्टँडर्ड प्लानमध्ये 100 एमबीपीएस पर्यंत इंटरनेट स्पीड देतो. एअरटेल प्लॅन प्रमाणेच हे अॅड-ऑन फायद्यांसह येते. ज्यामध्ये विनामूल्य विंक म्युझिक आणि शॉ अकादमीमध्ये एक वर्ष सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. या प्लॅनमध्येही यूजर्सना 3.3TB मासिक डेटा मिळतो.

Loading...
Advertisement

काही जणांसाठी 100 Mbps चा स्पीड सुद्धा कमी असू शकतो. अशा परिस्थितीत एअरटेल 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करते. कंपनीने याला ‘एंटरटेनमेंट’ प्लॅन (Entertainment Plan) असे नाव दिले आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 200 Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळेल. अॅड-ऑन म्हणून, प्लॅन Amazon Prime वर एक वर्षासाठई सबस्क्रिप्शन आणि Disney+ Hotstar Super आणि Airtel Xstream अॅप एक वर्षाच्या सबस्क्रिप्शनसह काही मनोरंजन पर्याय ऑफर करतो. इतर एअरटेल थँक्स अॅप विंक फ्री म्युझिक सबस्क्रिप्शनही मिळते.

Advertisement

एअरटेल थँक्स अॅपद्वारे एअरटेल ब्रॉडबँड योजना बुक करणार्‍या वापरकर्त्यांना 799 पासून पॅकवर 15% सूट मिळू शकते. एअरटेलच्या सर्व ब्रॉडबँड योजना मोफत वाय-फाय राउटरसह येतात.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply