Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

विदेशी गुंतवणूकदारांचे टेन्शन कायम..! एकाच महिन्यात शेअर बाजारातून काढलेत ‘इतके’ पैसे..

मुंबई : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) फेब्रुवारी महिन्यात भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत तब्बल 35,506 कोटी रुपये काढले आहेत. मागील आठवड्यापर्यंत हा आकडा 18,506 कोटी रुपये होता. भू-राजकीय तणाव आणि अमेरिकन मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता यामुळे FPI बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. FPIs चा देशातील बाजारपेठेत विक्रीचा हा सलग 5 वा महिना आहे. ऑक्टोबर 2021 पासून FPIs देशातील बाजारातून सातत्याने माघार घेत आहेत. मार्च 2020 पासून फेब्रुवारी 2022 मध्‍ये एफपीआय सर्वाधिक आहे. त्यावेळी FPIs ने देशातील बाजारातून 1,18,203 कोटी रुपये काढले होते.

Advertisement

डिपॉझिटरी डेटानुसार, FPIs 1 ते 25 फेब्रुवारी दरम्यान इक्विटीमधून 31,158 कोटी रुपये आणि कर्ज विभागातून 4,467 कोटी रुपये काढले आहेत. यादरम्यान त्यांनी हायब्रीड उपकरणांमध्ये 120 कोटींची गुंतवणूक केली आहे.

Advertisement

मॉर्निंगस्टार इंडियाचे सहाय्यक निदेशक हिमांशू श्रीवास्तव म्हणाले, की “अमेरिकन मध्यवर्ती बँकेने प्रोत्साहन उपाय मागे घेतल्याची आणि व्याजदरात उशीरा वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर एफपीआयचा प्रवाह वाढला आहे. याशिवाय रशिया-युक्रेन तणावामुळे एफपीआय सावधगिरी बाळगून भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांपासून दूर राहत आहेत.

Advertisement

कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल) प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले की, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा कल, कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकेतील रोख्यांवर उत्पन्न यावरून एफपीआयचा कल निश्चित होतो. अमेरिकेमध्ये, FPIs 10 वर्षांच्या रोख्यांवर परतावा वाढल्यावर बाँड मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सध्या या सर्व गोष्टींचा परिणाम एफपीआयवर होत आहे. अशा परिस्थितीत FPIs आणखी पैसे काढू शकतात.

Loading...
Advertisement

दरम्यान, सध्या जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. महागाई वाढली आहे. कच्च्या तेलाचा भडका उडाला आहे. वाहन उद्योगावरही परिणाम झाला आहे. इलेक्ट्रॉनिक उद्योगावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.

Advertisement

रशिया-युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी.. भारतीय शेअर बाजारावर झाला असा परिणाम..

Advertisement

विदेशी गुंतवणुकदारांचे टेन्शन वाढले..! शेअर बाजारातून तब्बल ‘इतके’ पैसे काढले; पहा, काय आहे नेमके प्रकरण..

Advertisement
Advertisement

Leave a Reply