Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया-यु्क्रेन युद्धाचा वाहन कंपन्यांनी घेतला धसका..! पहा, वाहन कंपन्या कोणता प्लान सुरू करण्याच्या विचारात..?

मुंबई : रशियाने युक्रेनच्या युद्धाचे दुष्परिणाम आता जगभरात जाणवत आहे. या संकटाचा परिणाम वाहन उद्योगावरही झाला आहे. ऑटोमेकर रेनॉल्ट आणि टायर निर्मात्या नोकिया टायर्ससह अनेक कंपन्यांनी शुक्रवारी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर उत्पादन बंद करण्याची किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा विचार सुरू केला आहे.

Advertisement

अमेरिकेने गुरुवारी रशियाविरुद्ध व्यापक निर्यात निर्बंध जाहीर केले. व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकांपासून सेमीकंडक्टर आणि विमानाच्या स्पेअर पार्ट्सपर्यंत आवश्यक वस्तूंचा जागतिक निर्यातीत पोहोच कमी केली. यामुळे कंपन्या आपल्या विनिर्माण योजना बदलण्यास किंवा पर्यायी पुरवठा मार्ग शोधू शकतात.

Advertisement

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या जागतिक सेमी कंडक्टर टंचाईमुळे वाहन उद्योग आधीच संकटात होता. अशा स्थितीत रशियाचा युक्रेनवरचे आक्रमण या कंपन्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे. या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, कारण युक्रेन आणि रशिया अशा अनेक वस्तूंचे उत्पादन करतात, ज्यांची जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात निर्यात होते.

Advertisement

रशियामध्ये पॅलेडियम धातू मोठ्या प्रमाणात आढळतो. रशिया या धातूचा (पॅलेडियम) सर्वात मोठा उत्पादक आहे. वाहनांमधून निघणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडसारख्या विषारी वायूंचे परिणाम कमी करण्यासाठी पॅलेडियमचा वापर केला जातो. या युद्धामुळे याचा पुरवठा विस्कळीत होईल आणि किंमती वाढतील. त्यामुळे वाहनांच्या किंमती पुन्हा वाढू शकतात.

Loading...
Advertisement

रशिया आणि युक्रेन सेमी कंडक्टर उत्पादन तसेच महत्त्वाचे वायू आणि धातू तयार करतात. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर या युद्धाचा थेट परिणाम त्यांच्यावर झाला आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 68.87 होती, जी आता प्रति बॅरल $ 100 च्या वर गेली आहे. त्याच वेळी, कच्च्या तेलाची किंमत गुरुवारी संध्याकाळी प्रति बॅरल $ 105.25 वर पोहोचली.

Advertisement

या दोन्ही देशांमध्ये इलेक्ट्रिक कार आणि त्यामध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटरी मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात. या युद्धामुळे इलेक्ट्रिक वाहने आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या बॅटरीवरही वाईट परिणाम होणार आहे. यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होऊन त्यांच्या किमती वाढतील. येत्या काही दिवसांत त्याचा वाईट परिणाम जागतिक वाहन उद्योगावर दिसू शकतो.

Advertisement

वाव.. एका चार्जवर तब्बल 150 किलोमीटर.. लवकरच होणार या दमदार इलेक्ट्रिक मोटारसायकलची एन्ट्री..

Advertisement
Advertisement

Leave a Reply