Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युक्रेनच्या राजधानीचे शहर संकटात..! रशियन सैन्याला रोखण्यासाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय..

दिल्ली : रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेने सातत्याने मार्गक्रमण करत आहे. अशा परिस्थितीत रशियन सैन्यापासून राजधानीचे संरक्षण करण्यासाठी युक्रेन सरकार अधिक सतर्क झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने शहरातील कर्फ्यूच्या कालावधीत वाढ केली आहे. या निर्णयाची आधिकृत घोषणा शहराच्या महापौरांनी केली आहे.

Advertisement

युक्रेनियन राजधानी कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी टेलिग्रामवर सांगितले, की कीवमध्ये संध्याकाळी 5 ते सकाळी 8 पर्यंत कडक संचारबंदी लागू असेल. दोन दिवसांआधी लागू करण्यात आलेला कर्फ्यू रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत होता. आता मात्र रशियन सैन्याचा सातत्याने वाढत असलेला धोका पाहता या वेळेत वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, रशियन सैन्य सातत्याने राजधानीकडे येत आहेत. आता तर सैनिक राजधानी कीवपासून थोड्याच अंतरावर असल्याचे वृत्त आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला आहे, की रशियन सैन्याने कीवच्या दिशेने वेगाने येत आहे आणि ते आता मुख्य शहराच्या केंद्रापासून 30 किमीपेक्षा कमी अंतरावर आहेत. त्याच वेळी, युक्रेनच्या सशस्त्र सैन्याने देशभरात रशियन सैन्याविरूद्ध जोरदार प्रतिकार सुरू ठेवला आहे. मात्र, रशियाच्या आक्रमणासमोर कोणत्याही मदतीशिवाय ते फार काळ टिकाव धरू शकणार नाही, असे दिसत आहे.

Advertisement

दरम्यान, आता युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिकेने मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेने युक्रेनला मोठी मदत जाहीर केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे की, युक्रेनला संरक्षण विभाग अतिरिक्त $350 दशलक्ष तात्काळ लष्करी मदत देईल. अमेरिकेने मदतीची घोषणा अशावेळी केली आहे, जेव्हा रशियाने युक्रेनचे अतोनात नुकसान केले आहे.

Loading...
Advertisement

देशातील अनेक शहरे उद्धवस्त झाली आहेत. एक लाखांपेक्षा जास्त लोकांना आपला देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये निर्वासित म्हणून राहणे भाग पडले आहे. आणि विशेष म्हणजे, युद्ध सुरू होण्याआधी अमेरिका, नाटो संघटना आणि युरोपीय देशांनी युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या घोषणा केल्या होत्या, रशियालाही धमक्या दिल्या होत्या. ऐनवेळी मात्र या देशांनी युक्रेनला वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे आज हा देश अत्यंत भीषण संकटात सापडला आहे.

Advertisement

दुसरीकडे, पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध टाकले आहेत. यावर रशियाचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी दिमित्री मेदवेदेव म्हणाले की, रशियाला आता पाश्चिमात्य देशांबरोबर राजनैतिक संबंधांची गरज नाही.

Advertisement

.. म्हणून युक्रेन एकटाच देतोय रशियाला टक्कर..! अमेरिका, ‘नाटो’ ने ऐनवेळी दिला झटका; पहा, काय आहेत नेमकी कारणे..

Advertisement
Advertisement

Leave a Reply