Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तब्बल 112 दिवसांनंतरही इंधनाचे भाव स्थिर.. पहा, देशात ‘या’ शहरात मिळतेय सर्वात स्वस्त पेट्रोल..

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी (26 फेब्रुवारी) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत, तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर मात्र प्रचंड वाढले आहेत. देशांतर्गत पातळीवर सलग 112 दिवसांनंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे. आज देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 95.41 रुपये (Delhi Petrol Price) आहे, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये (Delhi Diesel Price) आहे. तर मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.14 रुपये दराने विकले जात आहे.

Advertisement

नवीन दरानुसार, आजही देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 82.96 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे, तर डिझेलही येथे 77.13 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलसाठी मुंबई शहरात सर्वात जास्त 109.98 रुपये दर आहे, आणि दिल्लीमध्ये सर्वात स्वस्त आहे 95.41 रुपये दर आहे. त्याचवेळी भोपाळ, जयपूर, पाटणा, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेले आहे.

Advertisement

देशातील श्री गंगानगर येथे पेट्रोल 112.11 रुपये लिटर तर डिझेल 95.26 रुपये लिटर दराने विक्री होत आहे. तसेच मुंबईमध्ये पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेल 94.14 रुपये, भोपाळमध्ये पेट्रोल 107.23 रुपये तर डिझेल 90.87 रुपये, जयपूरमध्ये पेट्रोल 107.06 रुपये आणि डिझेल 90.70 रुपये, पाटणामध्ये पेट्रोल 105.90 रुपये तर डिझेल 91.09 रुपये, कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये तर डिझेल 89.79 रुपये, चेन्नई मध्ये पेट्रोल 101.40 रुपये तर डिझेल 91.43 रुपये, बंगळुरूमध्ये पेट्रोल 100.58 रुपये तर डिझेल 85.01 रुपये, नोएडामध्ये पेट्रोल 95.51 रुपये, तर डिझेल 87.01 रुपये, आग्रामध्ये पेट्रोल 95.05 रुपये तर डिझेल 86.56 रुपये, लखनऊमध्ये पेट्रोल 95.28 रुपये तर डिझेल 86.80 रुपये, चंदीगडमध्ये पेट्रोल 94.23 रुपये आणि डिझेल 80.90 रुपये प्रति लिटर या दराने विक्री होत आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, रशियाने युक्रेन विरोधात आधिकृत युद्धाची घोषणा केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. युद्ध थांबवण्याचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आहेत. या युद्धाचे घातक परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. कच्च्या तेलास जोरदार फटका बसला आहे. गेल्या 8 वर्षात प्रथमच ब्रेंट क्रूड तेलाची किंमत 100 डॉलरच्या पुढे गेली आहे. सध्या कच्च्या तेलाचे भाव 103.78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. याआधी सन 2014 मध्ये कच्च्या तेलाचे दर 105 डॉलरपर्यंत पोहोचले होते.

Advertisement

कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत असतानाही देशात गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाचे भाव वाढलेले नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे, देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुका. या राज्यात निवडणुका सुरू असल्याने सरकारने इंधनाचे दरवाढ केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आता काही मिडिया रिपोर्टस् नुसार, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन ते तीन टप्प्यात कंपन्यांकडून दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Advertisement

बाब्बो.. म्हणून तेलाच्या बाजारात उडालाय हाहाकार.. पहा, ‘त्या’ संकटाने कच्चे तेल कुठे पोहोचले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply