Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. एका चार्जवर तब्बल 150 किलोमीटर.. लवकरच होणार या दमदार इलेक्ट्रिक मोटारसायकलची एन्ट्री..

मुंबई : इलेक्ट्रिक वाहन निर्माता Hop Electric Mobility लवकरच आपली हाय स्पीड इलेक्ट्रिक दुचाकी लाँच करणार आहे. कंपनीने याआधी या दुचाकीबद्दल माहिती दिली आहे. ही इलेक्ट्रिक मोटारसायकल 100 किमी प्रतितास इतका वेग देईल, तर लिथियम-आयन बॅटरी एका चार्जवर 150 किमी अंतर चालण्यास सक्षम असेल. कंपनीने म्हटले आहे की त्यांनी देशातील निवडक पुरवठादार भागीदारांसह एक खास उपक्रम सुरू केला आहे.

Advertisement

कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक केतन मेहता म्हणाले, की जरी मोटारसायकल कंपनी आणि प्रयोगशाळेतील अभियंते आणि डिझायनर्सनी विकसित केले असले तरी, डीलर्स आणि वापरकर्त्यांचा अभिप्राय महत्त्वाचा आहे. आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, हॉप इलेक्ट्रिक ही मोबिलिटी असा उपक्रम सुरू करणारी पहिलीच कंपनी आहे.

Advertisement

मेहता पुढे म्हणाले, की या उपक्रमाद्वारे आम्हाला निवडक भागीदारांकडून थेट अभिप्राय आणि सूचना मिळत आहेत. देशभर 30,000 किलोमीटर पेक्षा जास्त ऑन-रोड अंतर्गत चाचणी करून आम्ही जी माहिती गोळा केली आहे त्याद्वारे आम्हाला फायदा होणार आहे. या माहितीच्या आधारे कंपनी आपली उत्पादने आणखी विकसित करेल. दिल्ली, जयपूर, जोधपूर, पटना, कोलकाता, हैदराबाद, लुधियाना यांसह देशातील 20 प्रमुख शहरांमध्ये 30,000 किमीचे चाचणी अंतर पार करण्यात तिने यश मिळाल्याचा कंपनीचा दावा आहे. दरम्यान, कंपनी पुढील तीन वर्षांत किमान 10 नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारपेठेत आणण्याची योजना तयार करत आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशभरात होंडा अॅक्टिव्हा स्कूटरची जबरदस्त क्रेझ आहे. इलेक्ट्रिक स्कूटर बाजार हा देशात सर्वात वेगाने वाढणारा विभाग आहे त्यामुळे कंपन्या सातत्याने नवनवीन दुचाकी लाँच करत असतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाही मागे नाहीत. कंपनीने अखेरीस इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये दाखल होण्याचे निश्चित केले आहे. कंपनीचे अध्यक्षांनी सांगितले, की कंपनी लवकरच इलेक्ट्रिक दुचाकी लाँच करण्याची शक्यता आहे. साधारण पुढील आर्थिक वर्षात होंडाची इलेक्ट्रिक दुचाकी मार्केटमध्ये येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

मात्र, ही कोणती दुचाकी असेल हे अद्याप निश्चित नाही कदाचित ही दुचाकी होंडा अॅक्टिव्हा देखील असू शकेल. बजाज ऑटोने इलेक्ट्रिक स्कूटरच्या रूपात देशातील लोकप्रिय चेतक ब्रँड पुन्हा सादर केला. यामुळे खरेदीदारांना ब्रँडशी परिचित होण्यास मदत झाली. आता बजाज चेतक 20 भारतीय शहरांमध्ये उपलब्ध आहे. अजून खरेदीदार शोधणे बाकी आहे. तथापि, Activa चे ब्रँड व्हॅल्यू चेतक प्रमाणेच आहे.

Advertisement

वाव.. आता लवकरच येणार स्वदेशी कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर; पहा, काय आहे कंपनीचा प्लान

Advertisement
Advertisement

Leave a Reply