Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..! लवकरच 60 रेल्वे स्टेशनमध्ये सुरू होणार ‘हा’ खास उपक्रम; वाचा महत्वाची माहिती..

मुंबई : देशात दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात. अनेक प्रवासी तर हजारो किलोमीटर लांबचा प्रवास करतात. दूरचा प्रवास करणारे लोक ट्रेनमध्‍ये तयार केलेले जेवण पसंत करतात. ट्रेनमध्ये खाद्य पदार्थांनाही चांगली मागणी असते. याद्वारे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होते. त्यामुळे रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. आता प्रवाशांसाठी आणखी एक खुशखबर रेल्वेने दिली आहे. होय, रेलरेस्ट्रो या बिहार येथील स्टार्टअप कंपनीने ट्रेनमध्ये खाद्य पदार्थांचा पुरवठा करणारी स्वतःची पुरवठा व्यवस्था सुरू केली आहे.

Advertisement

एका अहवालानुसार, RailRestro या वर्षात मार्चपर्यंत देशभरातील 50 ते 60 प्रमुख रेल्वे स्टेशन्सवर आपल्या पुरवठा प्रणालीद्वारे अन्न वितरण सुरू करणार आहे. RailRestro या खाद्य वितरण कंपनीस भारतीय रेल्वेच्या IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ने अधिकृत केले आहे.

Advertisement

RailRestro ने शुक्रवारी सांगितले, की कंपनी आपले नेटवर्कमध्ये वाढ करण्याचे नियोजन करत आहे. या अंतर्गत RailRestro आपल्या रेस्टॉरंटची संख्या दुप्पट करण्याचा विचार केला आहे. अहवालानुसार, RailRestro सध्या नागपूर (महाराष्ट्र), विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), इटारसी (मध्य प्रदेश), तिरुपती (आंध्र प्रदेश), गुवाहाटी (आसाम), कोटा (राजस्थान), लखनऊ, कानपूर (उत्तर प्रदेश) यांसारख्या अनेक गजबजलेल्या रेल्वे स्टेशनमध्ये अन्न वितरण करत आहे. त्यानंतर आता कंपनीच्या योजनेनुसार लवकरच भुवनेश्वर (ओडिशा), आसनसोल (पश्चिम बंगाल), जयपूर (राजस्थान), हावडा (पश्चिम बंगाल), गोरखपूर (उत्तर प्रदेश), रायपूर (छत्तीसगढ) यांसह इतर अनेक प्रमुख रेल्वे स्टेशनमध्ये अन्न वितरण सुविधा सुरू करणार आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे देशात रेल्वेचे मोठे महत्व आहे. रेल्वे प्रवास आधिक आरामदायक व्हावा यासाठी रेल्व विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. आता भारतीय रेल्वेने (Indian Railway) आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

Advertisement

वास्तविक, प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी रेल्वेने एक खास योजना सुरू केली आहे. ‘न्यू इंडिया’ च्या कल्पनेने उत्तर रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये एक मोठा मनोरंजन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. आता प्रवाशांना दिल्ली, भोपाळ, चंदीगड, लखनऊ, डेहराडून, कानपूर, कटरा, वाराणसी आणि काठगोदाम येथे प्रवास करताना शताब्दी आणि वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पारंपरिक रेडिओ संगीत ऐकण्याचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

रेल्वेसाठीच मिळालीय खुशखबर..! रेल्वेने ‘त्याद्वारे’ मिळवलेत तब्बल 7 हजार 891 कोटी रुपये..

Advertisement
Advertisement

Leave a Reply