Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काम की बात : स्मार्टफोनसाठी ‘या’ गोष्टी आहेत महत्वाच्या; स्टोरेज आणि स्पीडचे टेन्शन होईल दूर..

अहमदनगर : आजच्या काळात आपले जवळपास सर्व कामकाज स्मार्टफोनद्वारेच होते. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्मार्टफोन नसेल तर काहीच कामकाज करणे शक्य होणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे स्मार्टफोन व्यवस्थित असणे आणि योग्य वेगात कामकाज करणे गरजेचे ठरते. मात्र, बऱ्याचदा स्मार्टफोन खूप स्लो होतो काही वेळेस तर कामकाज करणेच बंद करतो. बऱ्याच जणांनी या अडचणींचा अनुभव घेतला असेलच. या अडचणी कमी करण्यासाठीही काही सोपे उपाय आहेत. ज्यांच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनचा स्पीड पहिल्यासारखा करू शकता. या कोणत्या टिप्स आहेत, त्याची माहिती घेऊ या..

Advertisement

तुम्हाला हे देखील माहित असेल, स्मार्टफोन स्लो होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे फोनमधील स्टोरेजची कमतरता. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये अनावश्यक डेटा, फाईल काढून टाकल्या तर फायद्याचे ठरेल. आपल्याला आवश्यक नसलेल्या किंवा एकापेक्षा जास्त वेळा डाउनलोड केलेल्या फाईल्स काढून टाका. ज्यामुळे स्मार्टफोनची मेमरी मोकळी होईल आणि प्रोसेसरवर ताण येणार नाही आणि फोन बंद पडणार नाही.

Advertisement

तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्टोरोजमध्ये वाढ करण्यासाठी स्मार्टफोनमधून डुप्लिकेट फाईल्स डिलीट करणे अत्यंत आवश्यक आहे. हे फोटो, काही कागदपत्रे आहेत जी स्मार्टफोनवर एकापेक्षा जास्त वेळा डाउनलोड केली आहेत. या डुप्लिकेट फाइल्स डिलीट केल्यास तुमचा स्मार्टफोन पुन्हा पुन्हा हँग होणार नाही.

Loading...
Advertisement

आपल्या स्मार्टफोनमध्ये काही फाइल्स किंवा माहिती असते, ज्याला कॅशे (Cache) म्हणतात. या फाइल्सची सहसा फारशी गरज नसते आणि जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची मेमरी मोकळी करायची असेल तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमधील कॅशे काढून टाकावे. तुम्ही या तीन सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुमचा स्मार्टफोन पुन्हा पुन्हा बंद होणार नाही आणि तुम्हाला जास्त स्टोरेजही मिळेल.

Advertisement

सॅमसंगला टक्कर देणार चीनी कंपनी..! दोन्ही कंपन्यांचे जबरदस्त स्मार्टफोनने घेतलीय एन्ट्री.. जाणून घ्या, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply