मुंबई : आजकाल यूजर्स पोस्टपेड प्लॅन्सना जास्त पसंती देत आहेत. हे लक्षात घेऊन, दूरसंचार कंपनी Vodafone-Idea काही उत्कृष्ट पोस्टपेड योजना ऑफर करत आहे. 399 रुपयांची योजना त्यापैकी एक आहे. या प्लानमध्ये कंपनी 40 जीबी डेटासह 150 जीबी अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. याबरोबरच, येथे आम्ही तुम्हाला Vodafone-Idea च्या आणखी काही पोस्टपेड प्लॅनची माहिती देऊ जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम प्लान घेऊ शकाल. या व्यतिरिक्त जिओ, एअरटेल आणि बीएसएनल सुद्धा अनेक पोस्टपेड प्लान ऑफर करत आहेत. त्यामुळे सध्या या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे.
399 रुपयांचा प्लान
व्होडाफोन-आयडियाचा हा पोस्टपेड प्लॅन सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनपैकी एक आहे. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी 40 जीबी डेटा देत आहे. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये तुम्हाला 150 GB अतिरिक्त फ्री डेटासह 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हरचा लाभही मिळेल. या प्लॅनमध्ये 100 मोफत एसएमएस मासिक आणि अमर्यादित कॉल देखील उपलब्ध आहे. कंपनी या प्लॅनच्या सदस्यांना Vi Movies आणि TV चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे.
499 रुपयांचा प्लान
या पोस्टपेड प्लानमध्ये कंपनी 75 जीबी डेटा देत आहे. हा प्लान 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिटसह येतो. प्लॅनमध्ये मासिक 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉल देखील दिले जात आहे. कंपनीचा हा प्लान Amazon Prime आणि Disney + Hotstar च्या एका वर्षाच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.
699 रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये कंपनी यूजर्सना इंटरनेट वापरण्यासाठी अनलिमिटेड डेटा देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत कॉल आणि मासिक 100 मोफत एसएमएस मिळतील. कंपनी या प्लॅनमध्ये Amazon Prime Video आणि Disney + Hotstar वर एका वर्षासाठी मोफत प्रवेश देखील देत आहे.
Jio, Vodafone-idea आणि Airtel चे महिनाभर चालणारे प्लान.. 90GB पर्यंत मिळतोय डेटा; चेक करा, डिटेल..