मुंबई : रशियाने युक्रेन विरोधात आधिकृत युद्धाची घोषणा केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. युद्ध थांबवण्याचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आहेत. या युद्धाचे घातक परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. कच्च्या तेलास जोरदार फटका बसला आहे. गेल्या 8 वर्षात प्रथमच ब्रेंट क्रूड तेलाची किंमत 100 डॉलरच्या पुढे गेली आहे. सध्या कच्च्या तेलाचे भाव 103.78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. याआधी सन 2014 मध्ये कच्च्या तेलाचे दर 105 डॉलरपर्यंत पोहोचले होते.
कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत असतानाही देशात गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाचे भाव वाढलेले नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे, देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुका. या राज्यात निवडणुका सुरू असल्याने सरकारने इंधनाचे दरवाढ केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आता काही मिडिया रिपोर्टस् नुसार, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन ते तीन टप्प्यात कंपन्यांकडून दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी गुरुवारी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. रशिया युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करणार आहे (Russia-Ukraine Conflict) युद्धाच्या घोषणेमुळे या प्रदेशातील ऊर्जा निर्यातीत व्यत्यय येण्याची भीती निर्माण झाली आहे. रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, जो प्रामुख्याने युरोपियन रिफायनरीजना कच्चे तेल विकतो. या व्यतिरिक्त, युरोपला नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा पुरवठादार आहे, त्याच्या पुरवठ्यापैकी सुमारे 35% पुरवठा करतो.
भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. तो आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो. गरजेच्या 50 टक्के गॅसही आयात केला जातो. रशिया-युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 100 डॉलरचा टप्पा पार केला आणि नवीन विक्रमी रेकॉर्ड गाठले. पुढील महिन्यात राज्याच्या निवडणुका संपल्यानंतर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वेगाने वाढ होण्याची विश्लेषकांचा अंदाज आहे, ज्यामुळे सरकार आणि मध्यवर्ती बँकेवर महागाई नियंत्रणासाठी पावले उचलण्यासाठी दबाव निर्माण होईल.
तेल मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर 2021 दरम्यान भारताने 82.4 अब्ज डॉलरचे तेल आयात केले. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही 108 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात, एप्रिल ते डिसेंबर 2020 दरम्यान, भारताने $39.6 अब्ज किमतीचे कच्चे तेल आयात केले. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी एकूण तेल आयात बिल $62.2 अब्ज होते आणि आर्थिक वर्ष 2019-20 साठी हे बिल $101.4 अब्ज होते आणि आर्थिक वर्ष 2018-19 साठी हे बिल $112 बिलियन होते.
बाब्बो.. म्हणून तेलाच्या बाजारात उडालाय हाहाकार.. पहा, ‘त्या’ संकटाने कच्चे तेल कुठे पोहोचले..?