Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. सॅमसंगने केलीय जबरदस्त कामगिरी; 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी बुक केलाय ‘हा’ दमदार स्मार्टफोन.. जाणून घ्या..

मुंबई : देश-विदेशातील दिग्गज स्मार्टफोन कंपनी Samsung Electronics ने अलीकडेच Galaxy S22 स्मार्टफोनची नवीन मालिका जाहीर केली. लाँच केल्यानंतर या फोनने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. एकट्या दक्षिण कोरियामध्ये 10 लाखांपेक्षा अधिक लोकांनी Galaxy S22 स्मार्टफोन प्री-ऑर्डर केले आहेत. कंपनीच्या मते, पहिल्याच दिवशी प्री-ऑर्डरची संख्या 3 लाखांच्याही पुढे गेली आहे. सॅमसंग गॅलेक्सी सीरीजच्या बाकीच्या स्मार्टफोन्ससमोर हे एक मोठे रेकॉर्ड ठरले आहे.

Advertisement

मागील रेकॉर्ड Galaxy Z Fold3 आणि Galaxy Z Flip3 कडे होते, जे ऑगस्ट 2021 मध्ये लाँच झाले होते. आणि लाँच झाल्यानंतर फक्त सात दिवसांनंतर, या फोनना एकूण 1.02 दशलक्ष युनिट्सची प्री-ऑर्डर मिळाली, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. याचा अर्थ Galaxy S22 मालिकेने Galaxy S8 ला मागे टाकले आहे, ज्याने आतापर्यंत सर्वात जास्त प्री-ऑर्डर मिळवल्या होत्या.
Samsung Galaxy S22 स्मार्टफोन Android 12 वर चालतो, ज्याच्या वर One UI 4.1 चा लेयर आहे. फोन Gorilla Glass Victus + पॅनेलने संरक्षित आहे. या फोनमध्ये 4nm octa-core Snapdragon 8 Gen 1 SoC आहे. Galaxy S22 Ultra मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड, 108 मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आहे. फोनमध्ये 40 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

Advertisement

दरम्यान, सॅमसंगने देशात पुन्हा नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यामुळे आता स्मार्टफोन मार्केटमध्ये दोन्ही कंपन्यांची जोरदार टक्कर होणार आहे. सॅमसंगने आपला स्वस्त Galaxy A03 स्मार्टफोन देशात लाँच केला आहे. फोनला 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 48 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे. देशात, Galaxy A03 Realme Narzo 30A आणि Infinix कंपनीच्या स्मार्टफोन बरोबर स्पर्धा करेल.

Loading...
Advertisement

Samsung Galaxy A03 स्मार्टफोन तीन कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. Galaxy A03 स्मार्टफोनच्या 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 11,999 रुपयांना मिळेल. Samsung Galaxy A03 स्मार्टफोन Samsung.com आणि आघाडीच्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढ करता येऊ शकतो.

Advertisement

सॅमसंगला टक्कर देणार चीनी कंपनी..! दोन्ही कंपन्यांचे जबरदस्त स्मार्टफोनने घेतलीय एन्ट्री.. जाणून घ्या, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply