Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. ‘त्यामुळे’ घराच्या स्वप्नांना बसणार झटका..! रशिया-युक्रेन युद्धामुळे होणार ‘हा’ परिणाम..

मुंबई : रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरू झालेल्या युद्धामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसू शकतो. रशिया आणि युक्रेनच्या संकटामुळे भारतात सिमेंटच्या किमती वाढू शकतात, असे सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम देशातील रिअल इस्टेट क्षेत्रावरही होऊ शकतो आणि येत्या काही महिन्यांत येथील घरांच्या किमतीही वाढतील.

Advertisement

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. पुरवठा साखळीवर याचा परिणाम होऊन कच्च्या मालाच्या किमती वाढतील. त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढणार आहे. महागाई वाढू नये म्हणून RBI धोरणात बदल करू शकते. याचा परिणाम गृहकर्जाच्या व्याजदरावर होणार आहे. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती आधीच प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून तेलाच्या किमती वाढत होत्या. युक्रेनच्या संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय हे त्याचे कारण होते.

Advertisement

रिअल इस्टेट (Real Estate) कंपन्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) चे अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया यांनी सांगितले की, कच्चा माल आणि ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे सिमेंट उत्पादक आधीच दबावाखाली आहेत. आता त्यांच्यावर दबाव वाढणार आहे. पटोडिया म्हणाले, शेवटी हा परिणाम रिअल इस्टेट उद्योगावरही दिसून येईल. कच्च्या मालाच्या किमती 20-30 टक्क्यांनी वाढल्यामुळे विकासकांनी प्रकल्पाच्या किमतीत वाढ केली आहे. आगामी काळात प्रकल्पांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे रिअल इस्टेट उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात 80 लाख नवीन घरे पूर्ण केली जातील. या योजनेसाठी सरकार 48,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. याआधी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ फक्त गरीब वर्गासाठी होता. पण, आता गृहकर्जाची रक्कम वाढवून शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही त्याच्या कक्षेत आणले आहे. केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे ही योजना राबवणार आहेत. या अर्थसंकल्पात सर्व घरांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या नल-जल योजनेसाठी 60 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Advertisement

Budget 2022 : लाखो लोकांना मिळणार हक्काचे घर; पहा, ‘या’ योजनेत सरकार किती घरे बांधणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply