Take a fresh look at your lifestyle.

1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात ‘या’ जबरदस्त मोटारसायकल; पहा, काय आहेत दमदार फिचर्स..

मुंबई : जर तुम्ही नवीन मोटारसायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट एक लाख रुपये आहे. तर आम्ही तुम्हाला अशाच काही उत्तम दुचाकींबद्दल सांगणार आहोत. या दुचाकी तुम्हाला एक लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतील. त्यात हिरो, यामाहा, बजाज, होंडा आणि टीव्हीएस कंपनीच्या दुचाकी आहेत.

Advertisement

Hero XPulse 200
एक लाखापेक्षा कमी किंमतीत ही दुचाकी उत्तम पर्याय आहे. Hero MotoCorp ने नुकतीच ही मोटारसायकल लाँच केली आहे. यात 199.6cc इंजिन आहे, जे 18.4 bhp पॉवर आणि 17.1 Nm टॉर्क जनरेट करते. त्याची सुरुवातीची किंमत 97 हजार रुपये आहे.

Advertisement

Yamaha FZ V3
शार्प आणि मस्क्युलर डिझाइन असलेल्या या दुचाकी 149cc, एअर-कूल्ड, 2 व्हॉल्व्ह, सिंगल सिलिंडर इंजिनद्वारे समर्थित आहेत, जे 13.2hp पॉवर आणि 12.8Nm टॉर्क जनरेट करतात. इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. एफझेड दुचाकीमध्ये सिंगल चॅनल एबीएस स्टँडर्ड देण्यात आले आहे. FZ ची किंमत 98,000 आणि FZS ची किंमत 97,680 रुपये आहे.

Advertisement

bajaj Pulsar 180 Neon
बजाज कंपनीच्या या दुचाकीने भारतीय बाजारपेठेतही आपला ठसा उमटवला आहे. त्याची किंमतही एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे. पल्सर 220F प्रमाणे या दुचाकीला सेमी फेअरिंग देण्यात आली आहे. हे 178 सीसी एअर-कूल्ड, कार्ब्युरेटेड इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 8,500 rpm वर 17 bhp ची पॉवर आणि 6,500 rpm वर 14 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) ने सुसज्ज असलेल्या या दुचाकीची किंमत 94,790 रुपये आहे.

Advertisement

Honda CB Hornet 160R
या दुचाकीला एलईडी हेडलाइट आणि डिजिटल कन्सोल आहे. यात 162.7 सीसी, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 15.09hp पॉवर आणि 14.5Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही दुचाकी CBS आणि ABS या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची किंमत 86,500 रुपये आहे.

Advertisement

TVS Apache 180
TVS ची ही दुचाकी सर्वात प्रसिद्ध आहे. ही लोकप्रिय दुचाकी एक लाखांपेक्षा कमी किमतीतही उत्तम पर्याय आहे. यात 177.4 सीसी इंजिन आहे, जे 16.62 बीएचपी पॉवर आणि 15.5 एनएम टॉर्क जनरेट करते. Apache 180 ची किंमत बीएस नसलेल्या मॉडेलसाठी 85,261 रुपये आणि ABS मॉडेलसाठी 91,291 रुपये आहे.

Advertisement

दुचाकी कंपन्यांच्या डोकेदुखीचा अहवाल आलाय; पहा, कसा झटका बसणार कंपन्यांना..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply