केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता; पहा, काय मिळणार फायदा..?
मुंबई : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. केंद्र सरकार होळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना स्पेशल फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम देण्याची घोषणा करू शकते. या योजनेत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना फेस्टिव्हल अॅडव्हान्स देते, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना सुमारे 10 हजार रुपये मिळू शकतात.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना या रकमेवर कोणतेही व्याजही द्यावे लागत नाही. तथापि, दरमहा तुमच्या पगारातून पगाराची आगाऊ रक्कम कापली जाते. गेल्या वर्षीही सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचार्यांना ही रक्कम 10 हप्त्यांमध्ये परत करण्याची सुविधा मिळू शकेल. म्हणजेच व्याजाशिवाय तुम्ही आरामात पैसे परत करू शकता. हे फक्त 1,000 रुपयांच्या मासिक हप्त्यांमध्ये भरता येते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम अंतर्गत सुमारे 4000-5000 कोटी रुपयांच्या वाटपाची घोषणा केली जाऊ शकते. राज्य सरकारनेही ही योजना अंमलात आणली तर सुमारे 8,000-10,000 कोटी रुपये खर्च होतील. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सरकार आगाऊ योजनेसाठी बँक शुल्क देखील घेईल. कर्मचारी देखील ही आगाऊ रक्कम डिजिटल पद्धतीने खर्च करू शकतील. याआधी, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा रजा प्रवास भत्ता (LTA) दोन वर्षांसाठी वाढ केला होता. यासह केंद्रीय कर्मचारी मार्च 2022 पर्यंत ईशान्य, लडाख, अंदमान-निकोबार आणि जम्मू-काश्मीरच्या प्रवासासाठी रजा प्रवास भत्ता (LTA) वापरू शकतील.
दरम्यान, केंद्र सरकार लवकरच सुमारे 24 कोटी खातेधारकांना खुशखबर देण्याची शक्यता आहे. यावेळी सरकार व्याजदरात वाढ करू शकते, असा अंदाज आहे. वास्तविक, 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील. याबाबतचा निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) घेतला आहे. ज्यांची बैठक पुढील महिन्यात होणार आहे. या बैठकीत चालू आर्थिक वर्षाचे व्याजदर ठरवले जाणार आहेत. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, की ‘ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक मार्चमध्ये गुवाहाटी येथे होणार आहे, ज्यामध्ये 2021-22 साठी व्याजदर निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे.’
वाव.. देशातील 24 कोटी लोकांना मिळणार खुशखबर.. पुढील महिन्यात सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता..