Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युक्रेन संकटामुळे आजही सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीचे भावही पडले; चेक करा नवीन दर..

मुंबई : रशिया-युक्रेन युद्धाचा सोन्या-चांदीच्या किमतीवर मोठा परिणाम होत आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 648 रुपयांनी घसरला आहे. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव आज 50,895 रुपये आहे. दुसरीकडे, चांदीच्या किंमतीतही तब्बल 1,418 रुपयांनी मोठी घसरण झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 64,613 रुपये आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यास प्राधान्य दिले जाते. गेल्या काही वर्षांत सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक सोन्या-चांदीमध्ये पैसे गुंतवणूकर करणे हा एक चांगला पर्याय म्हणून पाहतात. तुम्हीही सोने-चांदी खरेदी करणार असाल तर आज काय किमती आहेत हे जाणून घ्या..

Advertisement

सोने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सोने खरेदी करताना त्यावर केलेले हॉलमार्क नक्की पहा. हे चिन्ह सोन्याची शुद्धता दर्शवते. त्यामुळे सोने खरेदी करताना काही महत्वाच्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा.

Advertisement

दरम्यान, केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया सांगतात की, सध्याच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याकडे कल वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने या वर्षाच्या अखेरीस 58000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे पोहोचण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

परिस्थिती आणखी बिघडल्यास किंमती 60 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. रशिया आणि युक्रेनमधील संकटामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. जगभरातील शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरता आणि अन्य कारणे पाहता ते सोन्याकडे वळतील. त्यामुळे नजीकच्या भविष्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत 31 मार्च 2022 पर्यंत देशांतर्गत बाजारात सोने 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा गाठू शकते.

Advertisement

‘त्यामुळे’ सोने लवकरच गाठणार 60 हजारांचा टप्पा; पहा, कुणी व्यक्त केलाय हा अंदाज..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply