Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सॅमसंगला टक्कर देणार चीनी कंपनी..! दोन्ही कंपन्यांचे जबरदस्त स्मार्टफोनने घेतलीय एन्ट्री.. जाणून घ्या, डिटेल..

मुंबई : दिग्गज चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi चा सब-ब्रँड Redmi देशात दोन जबरदस्त स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज आहे. Xiaomi इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus 5G लाँच करण्याची घोषणा केली आहे. आगामी स्मार्टफोनचे टीझर पोस्टर जारी करताना सांगण्यात आले की हे दोन्ही स्मार्टफोन देशातील मार्केटमध्ये 9 मार्च रोजी लाँच होणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ 5G हे दोन्ही स्मार्टफोन 6.7 इंच AMOLED डिस्प्लेसह येतील. त्यांचा स्क्रीन रिफ्रेश दर 120Hz असेल. Note 11 Pro MediaTek Helio G96 आणि Pro Plus मॉडेल Qualcomm Snapdragon 695 सपोर्टसह येतील. या फोन्सना 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सपोर्ट दिला जाईल.

Advertisement

Redmi Note 11 Pro क्वाड रियर कॅमेरा सपोर्टसह ऑफर केला जाईल. यामध्ये 108MP, 8MP, 2MP, 2MP लेन्स सपोर्ट दिला जाईल. तर Redmi Note 11 Pro + ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. यात 108MP, 8MP, 2MP लेन्स मिळतील. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाईल. तर 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. हा फोन Android 12 आधारित MIUI 13 वर काम करेल. Redmi Note 11 Pro 4G आणि Redmi Note 11 Pro+ स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह येतील. फोनची किंमत 15,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.

Loading...
Advertisement

दरम्यान, सॅमसंगनेही पुन्हा नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यामुळे आता स्मार्टफोन मार्केटमध्ये दोन्ही कंपन्यांची जोरदार टक्कर होणार आहे. सॅमसंगने आपला स्वस्त Galaxy A03 स्मार्टफोन देशात लाँच केला आहे. फोनला 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 48 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे. देशात, Galaxy A03 Realme Narzo 30A आणि Infinix कंपनीच्या स्मार्टफोन बरोबर स्पर्धा करेल.

Advertisement

Samsung Galaxy A03 स्मार्टफोन तीन कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. Galaxy A03 स्मार्टफोनच्या 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 11,999 रुपयांना मिळेल. Samsung Galaxy A03 स्मार्टफोन Samsung.com आणि आघाडीच्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढ करता येऊ शकतो.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply