Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

77 दिवस चालणारे जबरदस्त प्लान..! मिळतोय तब्बल 115 GB डेटा; पहा, कोणत्या कंपनीचा प्लान आहे बेस्ट..?

मुंबई : Airtel आणि Vodafone-Idea वापरकर्त्यांना अनेक उत्तम प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहेत. प्लॅन्सच्या यादीमध्ये दोन्ही कंपन्यांचा प्लॅन 666 रुपयांमध्ये येत आहे. 77 दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये 115 जीबी पर्यंत डेटा आणि फ्री कॉलसह अनेक अतिरिक्त फायदेही दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये या दोनपैकी कोणती कंपनीचे प्लान आधिक फायदे देतात. तसेही टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लानचे दर मोठ्या प्रमाणात वाढ केले आहेत. त्यामुळे कंपन्यांचा फायदा होत आहे तर लोकांना मात्र सध्याच्या महागाईच्या दिवसात मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लानचा शोध वाढला आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडीया कंपनीच्या या दोन प्लानबाबत आधिक माहिती घेऊ या..

Advertisement

एअरटेलचा 666 रुपयांचा प्लान

Advertisement

एअरटेलचा हा प्लॅन 77 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 1.5 GB नुसार एकूण 115.5 GB डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 100 मोफत एसएमएससह देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल ऑफर करत आहे. प्लॅनमध्ये समाविष्ट असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये अॅमेझॉन प्राइम 30 दिवसांच्या विनामूल्य चाचणीसह विंक म्युझिक मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.

Loading...
Advertisement

Vodafone-Idea चा 666 रुपयांचा प्लान
77 दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉल ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएसचाही लाभ मिळेल. प्लॅनमध्ये उपलब्ध या मूलभूत फायद्यांव्यतिरिक्त कंपनी आणखी बरेच फायदे देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला वीकेंड डेटा रोलओव्हर देखील दिला जात आहे. प्लॅनचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे कंपनी यामध्ये डेटा डिलाईट अंतर्गत 2 GB पर्यंत बॅकअप डेटा देखील देत आहे.

Advertisement

200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 56GB डेटा; रिचार्जआधी चेक करा कोणता प्लान आहे बेस्ट ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply