Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता आलीय नफा कमी करण्याची वेळ.. पहा, युक्रेन संकटात कुणी केलेय ‘हे’ आवाहन..?

दिल्ली : रशिया-युक्रेन संघर्षामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. कारण हे दोन्ही देश सूर्यफुलाचे मोठे निर्यातदार आहेत. युद्ध दीर्घकाळ चालले तर सूर्यफूल तेलाची कमतरता भासू शकते. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्सने गुरुवारी केंद्र सरकारने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये खाद्यतेलाच्या बाबतीत आपला देश कसा स्वयंपूर्ण होऊ शकतो हे सांगितले. देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी आयातदारांनी कमी नफ्यात खाद्यतेलाची विक्री करावी, असे आवाहन संघटनेने केले.

Advertisement

महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर म्हणाले की, या बैठकीत पंतप्रधानांनी देशाला खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीही कृषी उत्पादन वाढ करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून देश खाद्यतेलाच्या बाबतीत आयातीवर अवलंबून आहे. एकूण गरजेपैकी 65 टक्के खाद्यतेल आयात करावे लागते.

Advertisement

त्यामुळे देशाचा महसूल घटत असून, त्याचा फटका सरकारला सहन करावा लागतो. जो पैसा देशातील शेतकऱ्यांकडे यायला हवा तो इतर देशांत जातो. ज्या देशांतून खाद्यतेलाची आयात केली जाते, त्या देशांत होणाऱ्या उपक्रमांनुसार दर बदलतात, त्यामुळे दर सतत कमी जास्त होत राहतात. हे पाहता तेलबियांच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे.

Loading...
Advertisement

देशाला खाद्यतेलाबाबत स्वयंपूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे ठक्कर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमती रोखण्यासाठी सरकारने स्वदेशी तेलबियांच्या उत्पादनावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. संघटनेचे सरचिटणीस तरुण जैन म्हणाले की, या गंभीर परिस्थितीत देशातील जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेलांवरील जीएसटी काढून टाकावा. याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे खाद्यतेल लोकांना कमी किमतीत उपलब्ध करून द्यावे.

Advertisement

रशिया-युक्रेनचा वाद.. पण, भडकणार देशातील खाद्यतेल; पहा, सूर्यफूल तेलास कसा बसणार झटका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply