Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामुळे’ सोने लवकरच गाठणार 60 हजारांचा टप्पा; पहा, कुणी व्यक्त केलाय हा अंदाज..?

मुंबई : रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम जागतिक बाजारासह देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून येत आहे. वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि भू-राजकीय तणाव या कारणांमुळे देशांतर्गत सोने मार्केटमध्ये सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया सांगतात की, सध्याच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याकडे कल वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने या वर्षाच्या अखेरीस 58000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे पोहोचण्याची शक्यता आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास किंमती 60 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. रशिया आणि युक्रेनमधील संकटामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. जगभरातील शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरता आणि अन्य कारणे पाहता ते सोन्याकडे वळतील. त्यामुळे नजीकच्या भविष्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत 31 मार्च 2022 पर्यंत देशांतर्गत बाजारात सोने 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा गाठू शकते.

Advertisement

भू-राजकीय जोखमीमुळे मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने 2.15 टक्क्यांनी वाढून 51750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आजच्या व्यवहारात सोन्यामध्ये सुमारे 1300 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव 1950 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. सुरक्षित गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदार इक्विटीमधून बाहेर पडत आहेत आणि सोने खरेदी करत आहेत.

Loading...
Advertisement

रशिया-युक्रेन प्रकरणामध्ये अमेरिका, युरोपियन देश आणि नाटो यांच्याकडून अपडेट येणे बाकी आहे.
अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिजर्व्ह पुढील महिन्यात व्याजदरात वाढ करणार आहे. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता तो व्याजदर वाढीचा निर्णय पुढे ढकलू शकते. महागाई सातत्याने वाढत आहे. अमेरिकेत महागाई 40 वर्षांत सर्वाधिक पातळीवर आहे, ब्रिटनलाही त्याचा फटका बसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाने सर्वाधिक पातळी गाठली आहे. ते प्रति बॅरल 100 डॉलरच्याही पुढे पोहोचले आहे. रशिया आणि युक्रेनसारख्या भू-राजकीय तणावानंतर जगभरात महागाई वाढत आहे.

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धाचा सोने दरावर मोठा परिणाम, गुंतवणुकदारांकडून मागणी वाढली..

Advertisement
Advertisement

Leave a Reply