Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता युरोपीय देश आक्रमक..! रशियाच्या विरोधात तयार होतोय ‘हा’ खतरनाक प्लान; जाणून घ्या..

दिल्ली : युक्रेनवर रशियाने आक्रमण केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. आता अमेरिकेसह युरोपीय देशांनी रशियावर आणखी कठोर निर्बंध टाकण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. युरोपियन युनियन (EU) ने सर्वात कठोर आणि सर्वात हानीकारक निर्बंध पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना केल्या आहेत. युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचे लक्ष्य युरोपसह संपूर्ण जगाची शांतता व्यवस्था स्थिर करणे आहे. यासाठी आम्ही सर्व मिळून रशियावर दबाव आणू.

Advertisement

आम्ही मोठ्या आणि लक्ष्यित निर्बंधांचे पॅकेज युरोपियन नेत्यांना परवानगीसाठी सादर करू, असे त्यांनी सांगितले. युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांनी या निर्बंधांना “सर्वात कठोर आणि सर्वात हानीकारक” निर्बंध म्हटले. बोरेल म्हणाले, की मोठ्या अण्वस्त्रधारी देशाने आपल्या शेजाऱ्यावर हमला केला आहे आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करणार्‍या देशांसाठी परिणामांची धमकी देत ​​आहे.

Loading...
Advertisement

“आम्ही रशियाच्या अर्थव्यवस्थेला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करू. या निर्बंधांना मंजुरी मिळाल्यास रशियाच्या आर्थिक पायावर आणि आधुनिकीकरणाच्या क्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होईल. या व्यतिरिक्त, आम्ही युरोपियन युनियनमध्ये स्थित रशियन मालमत्ता जप्त करू आणि त्यांच्या बँकांचा युरोपियन वित्तीय बाजारपेठेतील प्रवेश अवरोधित करू.

Advertisement

रशियाने पूर्व युक्रेनच्या दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्यानंतर टाकलेल्या निर्बंधांच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे या वेळी देखील पाश्चात्य देश टप्प्याटप्प्याने काम करत आहेत. ते म्हणाले, की आम्ही संयुक्त राष्ट्र, ब्रिटन आणि कॅनडा तसेच जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या संपर्कात आहोत. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी निर्बंधात आधिक वाढ करत 25 लष्करी अधिकारी, चार लष्करी उपकरणे निर्माते आणि चार बँकांचा यामध्ये समावेश केला आहे. पुढील टप्प्यात रशियन संसदेच्या 300 हून अधिक सदस्यांवर बंदी घालण्यात येईल. ते म्हणाले, की शुक्रवारपर्यंत निर्बंध कायदा बनतील, मात्र मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांची अंमलबजावणी होणार नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply