Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

स्मार्टफोन, लॅपटॉप देणार झटका.. पहा, कोणत्या जागतिक संकटाचा बसणार फटका..

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. युद्ध दीर्घकाळ चालले, तर त्याचा प्रभाव केवळ रशिया आणि युक्रेनपर्यंत मर्यादित राहणार नाही. अवघ्या जगालाच या युद्धाचे चटके बसणार आहेत. तसेही या युद्धाचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. शेअर बाजार कोसळले आहेत. महागाई वाढली आहे. त्यानंतर आता या संकटाचा इलेक्ट्रॉनिक उद्योगासही फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. स्मार्टफोन, कार, लॅपटॉपसह प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या किंमती प्रचंड वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

रॉयटर्सच्या अहवालानुसार, अमेरिकेला 90 टक्के सेमी कंडक्टर ग्रेड निऑन पुरवठा युक्रेनमधून येतो. तर 35 टक्के पॅलेडियम रशियाकडून अमेरिकेला पुरवठा केले जाते. जागतिक पुरवठ्यात रशियाचा वाटा 45 टक्के आहे. युक्रेन आणि रशियाकडून होणारा पुरवठा बंद झाल्यास, सेन्सर्स आणि मेमरीसह उत्पादनाचे काम थांबू शकते. हे सर्व घटक सेमीकंडक्टर बनवण्याच्या उद्योगांना अडचणी निर्माण करू शकतात.

Advertisement

एका जपानी कंपनीने सांगितले, की या उत्पादनांचा पुरवठा आधीच कमी होता. अशा परिस्थितीत, युद्धाचा धोका आणखी वाढल्यास पुरवठा पूर्णपणे बंद केला जाऊ शकतो, ज्यामुळे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. सेमीकंडक्टर प्रत्यक्षात सिलिकॉनपासून बनवले जातात. ते विजेचे चांगले वाहक आहेत. जे मायक्रो सर्किटमध्ये बसवून तयार केले जाते. सेमी कंडक्टरशिवाय कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाची कल्पना केली जाऊ शकत नाही. सेमीकंडक्टर कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, वायरलेस नेटवर्किंग, 5G, IoT, ड्रोन, रोबोटिक्स यांसारख्या कंपन्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

Loading...
Advertisement

तसे पाहिले तर आधीच सेमी कंडक्टरची प्रचंड कमतरता आहे. या टंचाईमुळे वाहन, मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. त्यात आता युक्रेन-रशिया संकटाने डोकेदुखीत वाढ केली आहे. युद्धाचा धोका आधिक वाढल्यास पुरवठा ठप्प होऊ शकतो परिणामी लॅपटॉप, स्मार्टफोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या किंमती भरमसाठ वाढू शकतात.

Advertisement

नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बसलाय झटका; पहा, कशामुळे वाहनांची विक्री घटली..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply