Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रिलायन्स जिओचे जबरदस्त प्लान..! महिनाभरासाठी मिळतोय तब्बल 6600GB डेटा; पहा, किती आहे किंमत ?

मुंबई : जर तुम्हाला जास्त प्रमाणात इंटरनेट डेटाची आवश्यकता असेल आणि तुम्ही जर जास्त डेटा असणारे प्लान शोधत असाल तर असे अनेक प्लान टेलिकॉम कंपन्यांकडे आहेत. रिलायन्स जिओ फायबर (Reliance Jio Fiber) तुम्हाला दोन उत्तम योजना ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1Gbps चा सुपरफास्ट इंटरनेट स्पीड आणि 6600GB डेटा मिळेल. 30 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये, कंपनी Netflix, Amazon Prime Video, Disney + Hotstar, Voot Select आणि Zee5 यांसह जवळपास सर्व प्रीमियम OTT अॅपवर मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. या प्लानबद्दल आधिक माहिती घेऊ या..

Advertisement

3999 रुपयांचा प्लान
जिओ फायबरचा हा प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी अमर्यादित डेटा देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला 1Gbps चा जबरदस्त इंटरनेट स्पीड मिळेल. अमर्यादित व्हॉईस कॉलसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar व्यतिरिक्त अनेक लोकप्रिय OTT अॅप मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Advertisement

8499 रुपयांचा प्लान
जिओ फायबरचा हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी 1Gbps च्या स्पीडने 6600GB डेटा दिला जात आहे. प्लॅनच्या ग्राहकांना कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कवर मोफत कॉल देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक अतिरिक्त फायदे देखील मिळतील. यामध्ये Netflix, Amazon Prime Video, Disney + Hotstar, Sony Liv आणि Zee5 आणि इतर अनेक OTT अॅप मोफत सदस्यत्व समाविष्ट आहे.

Loading...
Advertisement

2499 रुपयांचा प्लान
या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला 30 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित डेटा देत आहे. तथापि, या प्लॅनमध्ये तुम्हाला 1Gbps ऐवजी 500Mbps चा इंटरनेट स्पीड मिळेल. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा आणि फ्री कॉल दिले जात आहे. इतर योजनांप्रमाणे हे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने+ हॉटस्टार, सोनी लिव्ह आणि Zee5 सारख्या लोकप्रिय OTT अॅप मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.

Advertisement

फक्त जिओच नाही तर ‘या’ कंपन्याही देतात दररोज 3GB डेटा.. पहा, तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट

Advertisement
Advertisement

Leave a Reply