Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

स्मार्टफोनचा धमाका..! येतोय आणखी एक दमदार स्मार्टफोन; पहा, काय आहे किंमत आणि हटके फिचर

मुंबई : देशात स्मार्टफोनचे मोठे मार्केट आहे. त्यामुळे देशात सातत्याने नवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. या महिन्यातही अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन मार्केटमध्ये आले आहेत. आणखीही काही कंपन्या तयारी करत आहेत. दिग्गज स्मार्टफोन निर्माता कंपनीन मोटोरोलाने नवीन दमदार स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन एकदम खास असणार आहे. त्यामुळेच सॅमसंग, शाओमी, ओप्पो, वीवो या कंपन्यांना जोरदार टक्कर देणार आहे.

Advertisement

कंपनीने Moto G Stylus हा नवा स्मार्टफोन कंपनीने अमेरिकेत लाँच केला आहे. हा फोन भारतात कधी लाँच होणार यासंदर्भात अद्याप माहिती उपलब्ध नाही. Moto G Stylus या स्मार्टफोनची किंमत जवळपास 22,400 रुपये आहे. हा फोन अमिरिकेमध्ये कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि Amazon द्वारे खरेदी केला जाऊ शकतो.

Advertisement

मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फिचर्स आहेत. यात 6GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे. सध्या हा फोन एकाच व्हॅरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Moto G Stylus स्मार्टफोन Stylus Pen सोबत येतो. यामुळे फोन अनलॉक न करता नोट्स करू शकतात.

Loading...
Advertisement

Motorola च्या Moto G Stylus या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 6.58 इंच फुल एचडी+ LCD डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Metallic Rose आणि Twilight Blue रंगात उपलब्ध आहे. Moto G Stylus स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएस वर चालणारा आहे. सुरक्षेसाठी साइड माउंटेड साइड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त अन्य महत्वाचे फिचर कंपनीने दिले आहेत. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनमध्ये असणारे फिचर्स कमी स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध आहेत. देशात हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, याबाबत कंपनीने अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. मात्र, हा स्मार्टफोन येथेही लवकरच लाँच होऊ शकतो.

Advertisement

देशातील स्मार्टफोनवाले लवकरच होणार 1 अब्ज; जाणून घ्या, काय आहे नेमके कारण..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply