रशिया-युक्रेन युद्धाचा असाही इफेक्ट..! एकाच झटक्यात श्रीमंतांचे तब्बल 3 लाख कोटी पाण्यात
मुंबई : गुरुवारी सकाळी अखेर रशियाने युक्रेनवर थेट आक्रमण केले. यामुळे जगभरातील शेअर बाजारातही गोंधळ उडाला. युद्ध सुरू झाल्यानंतर 4-5 तासांत जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या संपत्तीत 3.11 लाख कोटी रुपयांची घट झाली. त्याचवेळी भारताबद्दल सांगितले तर मुकेश अंबानी, गौतम अदानी, उदय कोटक, दिलीप संघवी यांच्यासह टॉप 10 उद्योगपतींनाही 60 हजार कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्लाचे एलन मस्क यांच्या संपत्तीत 1 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची परिस्थिती होती, त्यामुळे जगभरातील बाजारात गोंधळ सुरू होता. पण, आज सकाळी रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई केल्याने शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला. फोर्ब्सच्या रिअल-टाइम डेटानुसार, श्रीमंत उद्योगपतींच्या नोंदणीकृत कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 21,000 कोटी रुपयांची घसरण झाली होती. त्याचप्रमाणे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना 9,700 कोटी रुपयांचे, एचसीएल टेक्नॉलॉजीचे शिव नाडर यांचे 5,300 कोटी रुपयांचे आणि राधाकिशन दमाणी, दिलीप संघवी आणि कुमार बिर्ला यांसारख्या बड्या उद्योजकांचेही हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.
युद्धाची बातमी येताच अमेरिका, ब्रिटन, जपान, भारत आणि चीनसह मोठ्या देशांचे शेअर बाजार कोसळले. यामुळे जगातील टॉप 20 श्रीमंतांचे काही तासांत लाखो डॉलर्सचे नुकसान झाले. या यादीत टेस्लाचे एलन मस्क प्रथम क्रमांकावर आहेत. फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. जगातील टॉप 3 उद्योगपतींबद्दल सांगितले तर एलन मस्क, बर्नार्ड अर्नाल्ट आणि जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 1.51 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. आता टॉप 20 श्रीमंतांच्या नुकसानीचे आकडे बघितले तर युद्धाच्या आगीत एकाच दिवसात 3.11 लाख कोटी रुपये वाया गेले.
अर्र.. 23 श्रीमंतांचे तब्बल 2.38 लाख कोटी पाण्यात.. पहा, कोणत्या संकटाचा बसलाय जोरदार झटका..?