Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. पाकिस्तानचा रशिया दौरा गेला पाण्यात..! म्हणून राष्ट्राध्यक्ष पुतिन भेटले सुद्धा नाहीत; जाणून घ्या, नेमके कारण..

दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियन सैन्याने युक्रेनवर हमले करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियामध्ये पोहोचताच पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केले. इम्रान खान यांच्या रशिया दौऱ्याची ही योग्य वेळ नाही, असे जाणकारांचे मत आहे. पुतीन सध्या युक्रेन प्रकरणात व्यस्त असल्याने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला पुतिन यांच्या मंत्रालयाबरोबर बैठकीचे कोणतेही वेळापत्रक मिळालेले नाही.

Advertisement

20 वर्षांहून अधिक काळातील पाकिस्तानी नेत्याचा हा पहिलाच रशिया दौरा होता. अशा परिस्थितीत इम्रान खान यांचा रशिया दौरा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फायद्याचा ठरेल, यामुळे पाकिस्तानातील जनता आणि पाकिस्तानी प्रसारमाध्यमे उत्सुक होती.
सध्या पाकिस्तानला महागाईचा सामना करावा लागत आहे, पण ज्यावेळी इम्रान खान रशियामध्ये पोहोचले, त्याचवेळी पुतिन यांनी युक्रेनवर हमला करण्याची घोषणा केली. आता पुतिन युक्रेन प्रकरणी व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत इम्रान खान यांना पुतिन यांची भेट न घेताच पाकिस्तानात परतावे लागल्याचे मानले जात आहे.

Advertisement

युक्रेन आणि रशियामधील तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. इम्रान खान यांचा रशिया दौरा दोन वर्षांआधी प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु कोरोनामुळे ते शक्य होऊ शकले नाही, असे पाकिस्तानी मीडिया सांगत आहे. पण आता व्लादिमीर पुतिन यांची भेट न घेताच ते माघारी परतत असल्याची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Loading...
Advertisement

पाकिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडून इम्रान खान यांच्या दौऱ्याशी संबंधित माहिती मागवली होती, मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे, पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री चौधरी यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, पंतप्रधान इम्रान खान यांचा रशिया दौरा सुरू असून, वेळापत्रकानुसार पंतप्रधान आज पाकिस्तानला परतणार आहेत.

Advertisement

Ukraine-Russia Crisis : युद्धाच्या वातावरणातही पाकिस्तानचे पंतप्रधान चाललेत रशिया भेटीला.. काय आहे कारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply