Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

स्वदेशी कंपनीच्या दुचाकींची विदेशात क्रेझ..! पहा, कोणत्या कंपनीने केलेय ‘हे’ जबरदस्त रेकॉर्ड

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या TVS मोटर कंपनीने नुकतीच मोठी कामगिरी केली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीची परदेशातील निर्यात 10 लाख युनिट्सवर पोहोचली आहे. या भारतीय कंपनीने आर्थिक वर्षात प्रथमच निर्यातीचा हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यामध्ये TVS मोटर कंपनी तसेच PT TVS, इंडोनेशियाचाही समावेश आहे.

Advertisement

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “मुख्य निर्यातींमध्ये TVS Apache, TVS HLX, TVS Raider आणि TVS Neo Series यांचा समावेश आहे. जागतिक दुचाकी विक्रीत झालेल्या वाढीमुळे या यशात मोठा हातभार लागला आहे. TVS मोटरचे आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, मध्य आणि लॅटिन अमेरिकेतील 80 देशांमध्ये अस्तित्व आहे.

Advertisement

कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले, की “टीव्हीएस मोटर कंपनीसाठी 10 लाख निर्यात चिन्ह हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. वैयक्तिक गतिशीलतेमध्ये जागतिक कंपनी बनण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.” ते म्हणाले, की “TVS मोटर नेहमीच गुणवत्ता, तंत्रज्ञानासाठी वचनबद्ध आहे आणि भविष्यात यामध्ये आणखी वाढ होणे गरजेचे आहे. कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. एन. राधाकृष्णन यांनी चालू आर्थिक वर्षात कंपनीने हा टप्पा गाठल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, की सातत्याने मजबूत निर्यात कामगिरी आमच्या ग्राहकांच्या अनुभवाचा आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचा पुरावा आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील दूरसंचार कंपन्यांनंतर आता वाहन क्षेत्रातील कंपन्याही कॅशबॅक ऑफर देत आहेत. देश-विदेशातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी यामाहाने देशातील काही राज्यांत कॅशबॅक योजना सुरू केली आहे. Yamaha Motor India ने पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि देशाच्या उत्तर-पूर्व भागांमध्ये हायब्रीड स्कूटरवर कॅशबॅक ऑफर जाहीर केल्या आहेत. Yamaha ही कॅशबॅक ऑफर Fascino 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid स्कूटरवर फेब्रुवारी महिन्यापर्यंत देत आहे.

Advertisement

आसाम, पूर्वोत्तर आणि पश्चिम बंगालमध्ये, Fascino 125 Fi Hybrid या स्कूटर खरेदीवर 2500 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर करत आहे. महाराष्ट्रात Fascino 125 Fi Hybrid आणि Ray ZR 125 Fi Hybrid वर 2500 रुपये कॅशबॅक दिला जात आहे. तामिळनाडूमध्ये Fascino 125 Fi Hybrid आणि Ray ZR 125 Fi Hybrid वर 5000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे.

Advertisement

दुचाकी खरेदीचा विचार करताय..? ; जाणून घ्या, कोणत्या नव्या दुचाकींची होणार एन्ट्री..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply