Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रेल्वेसाठीच मिळालीय खुशखबर..! रेल्वेने ‘त्याद्वारे’ मिळवलेत तब्बल 7 हजार 891 कोटी रुपये..

मुंबई : कोरोना संकटाचा रेल्वेलाही मोठा फटका बसला आहे. आता या संकटातून रेल्वे हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रेल्वे फेऱ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महत्वाच्या उत्पन्नाचा प्रश्न मिटला आहे. मात्र, दुसऱ्या मार्गानेही रेल्वेने पैशांचा बंदोबस्त केला आहे. तो म्हणजे मालवाहतूक. कोरोनाच्या संकटात प्रवासी वाहतूक बंद असताना याच मालवाहतुकीने रेल्वेला आधार दिला होता. आताही रेल्वेने माल वाहतुकीद्वारे भरघोस कमाई केली आहे. बिजनेस डेव्हलपमेंट युनिटला (Business Development Unit) चालना देत उत्तर रेल्वेने यावेळी मालवाहतुकीत विक्रम केला आहे. रेल्वेला 2019-2020 ते 2020-2021 या आर्थिक वर्षात सुरुवातीच्या मालवाहतुकीत सुमारे 18 टक्के वार्षिक वाढ अपेक्षित आहे.

Advertisement

या वर्षी उत्तर रेल्वेने मागील सर्व विक्रम मोडीत काढत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी अखेरपर्यंत मूळ मालवाहतूक उत्पन्न 7,045 कोटी रुपये होते. मात्र यंदा सर्व प्रयत्नांनी आता हा महसूल 7 हजार 891 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी उत्तर रेल्वेसाठी महसूलाचे उद्दिष्ट रेल्वे बोर्डाने 9,500 कोटी रुपये ठेवले आहे.

Advertisement

उत्तर रेल्वेच्या म्हणण्यानुसार, यावर्षात रेल्वे 60 दशलक्ष टन+ प्रारंभिक लोडिंग क्लबमध्ये सामील झाली आहे. ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. उत्तर रेल्वे कागद, गूळ, साबण, तुरटी, FMCG यासारख्या नवीन मालाची विक्रमी वेळेत कमी खर्चात वाहतूक करत आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशात रेल्वेने प्रवास करणे आता अधिक सुरक्षित होणार आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व मध्य रेल्वे (ECR) विभाग लवकरच ‘कवच’ नावाची प्रणाली सुरू करणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रेल्वे सुरळीत चालण्यास मदत होणार आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 2022-23 मध्ये सुरक्षेसाठी स्वदेशी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान कवच (कवच तंत्रज्ञान) अंतर्गत 2,000 किमीचे नेटवर्क आणले जाईल. रेल्वेचे जाळे सुरक्षित करण्याबरोबरच त्याच्या क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीनेही या तंत्रज्ञानाच उपयोग होणार आहे.

Advertisement

ईसीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, ही प्रणाली पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन धनबाद मार्गावर स्थापित केली जाईल आणि त्यासाठी अंदाजे 151 कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 408 किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग देशातील 77 रेल्वे स्टेशन आणि 79 लेव्हल क्रासिंग गेट समाविष्ट करणारा एक महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर ताशी 130 किमी वेगाने रेल्वे चालवण्यास विभागाने परवानगी दिली आहे.

Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! ‘या’ रेल्वेमध्ये सुरू होणार ‘हा’ खास उपक्रम; वाचा महत्वाची माहिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply