Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. देशातील पहिलाच प्रीपेड प्लान..! फक्त 7 रुपयांत 5GB डेटा; तीन महिने रिचार्जचे टेन्शन विसरा..

मुंबई : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL 4G नेटवर्कशिवायही अनेक 4G प्रीपेड योजना ऑफर करते. आज आम्‍ही तुम्‍हाला कंपनीच्‍या अशाच काही प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत, जे अशा वापरकर्त्‍यांसाठी उत्तम आहेत, जे सध्या वर्क फ्रॉम होम (work from home ) करत आहेत. जर तुम्ही अशाच प्लानच्या शोधात असाल, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर डेटा मिळेल, तोही कमी किमतीत, तर BSNL कडे तुमच्यासाठी खूप प्लान्स आहेत. तुमच्या सोयीसाठी, आम्ही बीएसएनएलच्या अशा काही योजनांची यादी तयार केली आहे, जी कमी किंमतीत चांगली वैधता आणि भरपूर डेटा प्रदान करतात.

Advertisement

BSNL चा 599 रुपयांचा प्लॅन हा वर्क फ्रॉम होम प्लान आहे जो 84 दिवसांच्या वैधतेसह येतो, म्हणजेच रोजची किंमत फक्त 7.13 रुपये आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना संपूर्ण वैधतेसाठी दररोज 5GB डेटा मिळतो. देशातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरने असा कोणताही प्रीपेड प्लॅन ऑफर केलेला नाही. 5GB डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 80 Kbps पर्यंत कमी होतो. Zing च्या मोफत सबस्क्रिप्शनसह दररोज 100 SMS देखील मिळतात. याशिवाय, 12 pm ते पहाटे 5 दरम्यान अमर्यादित मोफत हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो, ज्यामुळे त्यांचा दिवसभराचा FUP डेटा प्रभावित होत नाही.

Advertisement

जर तुम्हाला आणखी कमी किंमतीतील प्लान हवे असतील तर तुमच्यासाठी STV_299 हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. हा प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि दररोज 3GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलसह दररोज 100 एसएमएस ऑफर करतो. योजनेची दैनिक किंमत 9.90 रुपये आहे.

Loading...
Advertisement

BSNL 247 रुपयांचे व्हाउचर देखील ऑफर करते जे 30 दिवसांच्या वैधतेसह आणि या प्लानमध्ये 50GB डेटा वाटले तर एकाच वेळी सुद्धा वापरता येऊ शकतो. दैनंदीन डेटा मर्यादेची अट या प्लानमध्ये नाही. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना BSNL ट्यून, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएससह Eros Now मनोरंजन सेवांचे Over The Top (OTT) फायदे देखील मिळतात. या प्लॅनमध्ये रोजची किंमत फक्त 8.23 रुपये ​​आहे.

Advertisement

200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 56GB डेटा; रिचार्जआधी चेक करा कोणता प्लान आहे बेस्ट ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply