Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जरा हटके..! चक्क कचऱ्यापासून तयार होणार पेट्रोल-डिझेल; पहा, कोणता देश करणार ‘हा’ चमत्कार..?

मुंबई : एकेकाळी पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी इतर देशांवर अवलंबून असलेला आफ्रिकन देश झांबिया (Zambia) आता इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. झांबिया आता कचऱ्यापासून पेट्रोल आणि डिझेल तयार करत आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याची सुरुवात झांबियन कंपनी सेंट्रल आफ्रिकन रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशनने केली आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी करणे हा कंपनीच्या या उपक्रमाचा उद्देश आहे. तथापि, यामुळे झांबिया या आफ्रिकन देशालाही अनेक फायदे होतील.

Advertisement

इंधन तयार करण्यासाठी रबर टायर आणि प्लॅस्टिक कॅन वापरतात. त्यांचे तुकडे करून मोठ्या भट्टीत टाकतात. ते अणुभट्टीमध्ये उच्च तापमानात विरघळले जातात आणि काही उत्प्रेरक जोडून पेट्रोलियम इंधन तयार केले जाते. या तंत्रज्ञानाने पेट्रोलियम इंधन तयार करणारा झांबिया हा जगातील पहिलाच देश आहे. याआधीही असे प्रयोग अन्य देशांनी केले आहेत.

Advertisement

रॉयटर्सच्या अहवालानुसार, पावणे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात इंधन आयात करण्यासाठी दरवर्षी $1.4 अब्ज खर्च केले जात आहेत. झांबियामध्ये दररोज 14 कोटी लिटर तेल वापरले जाते. त्याचबरोबर नवीन उपक्रमातून सुमारे दीड टन कचऱ्यापासून 600 ते 700 लिटर पेट्रोल आणि डिझेल तयार केले जात आहे. देशात पेट्रोल आणि डिझेल तयार झाल्यावर इतर देशांवरील अवलंबित्व संपुष्टात येईल आणि आर्थिक दिलासाही मिळेल, असा कंपनीचा विश्वास आहे.

Loading...
Advertisement

जगातील अनेक देशांमध्ये वाढत्या कचऱ्यामुळे पर्यावरणाला अनेक प्रकारे धोका निर्माण होत आहे. त्यामुळे जगातील अनेक कंपन्या कचरा दूर करण्यासाठी आणि इंधन तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानात गुंतवणुकीत वाढ करत आहेत. सेंट्रल आफ्रिकन रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकाऱ्यांनी सांगितले, की कचऱ्यापासून पेट्रोलियमचे उत्पादन करणारी झांबियातील कंपनी म्हणतात की जर पूर्ण क्षमतेचा वापर केला तर देशाच्या 30 टक्के इंधनाची गरज या माध्यमातून पूर्ण होईल.

Advertisement

एका अंदाजानुसार, जगात सुमारे 8.3 अब्ज टन प्लास्टिक आहे. त्यांचा वापर पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठी केला तर जगभरातून कचरा निघून जाईल. याबरोबरच इंधन मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

Advertisement

ऐकावं ते नवलच..! आता झाडेही होणार डिजिटल; एका स्कॅनवर मिळणार डिटेल माहिती.. पहा, कुणी सुरू केलाय ‘हा’ डिजिटल प्रयोग..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply