बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर..! बँकेच्या कामकाज होणार आणखी डिजिटल; पहा, सरकारने काय म्हटलेय..?
मुंबई : देशातील बँक प्रणालीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यासाठी बँकांना सरकारकडून वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येत असतात. आताही बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाचा अपडेट मिळाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले, की बँकांनी ग्राहकांच्या सुविधांकडे आधिक लक्ष दिले पाहिजे जेणेकरुन कर्जदारांसाठी अडचणी येणार नाहीत.
अर्थमंत्र्यांनी सोमवारी सांगितले, की बँकांनी ग्राहकांच्या सुविधांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे जेणेकरून कर्जदारांसाठी प्रक्रिया सुलभ करता येईल. तथापि, बँकांनी ग्राहकांना कर्ज देण्यासाठी कर्ज देण्याच्या मानकांमध्ये हलगर्जीपणा करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी सरकारच्या क्रेडिट गॅरंटी निधी ट्रस्टचा देखील संदर्भ दिला.
अर्थमंत्री म्हणाले, की “बँकांनी अधिकाधिक ग्राहक अनुकूल बनण्याची गरज आहे परंतु प्रतिकूल जोखीम घेण्याच्या मर्यादेपर्यंत नाही. तुम्हाला ते घेण्याची गरज नाही. परंतु तुम्ही ग्राहकांच्या सोयी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि अधिकाधिक मैत्रीपूर्ण व्हा. बँकेतील डिजिटायजेशनची प्रक्रिया वाढत असून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात येत आहे. हे गोष्टी सुलभ करेल.
येत्या दोन महिन्यांत बँक पूर्णपणे डिजिटल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वासार्ह रोख प्रवाह लक्षात घेता, लहान व्यावसायिक क्षेत्रांना कर्जाची वाढ वैयक्तिक कर्जाच्या संख्येपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. महसूल सचिव तरुण बजाज म्हणाले, की बँकांना अधिक कर्ज देण्याची आणि आर्थिक वाढीस समर्थन देण्याची गरज आहे. कंपन्यांचे रेकॉर्ड आता चांगल्या स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसे पाहिले तर सध्या बँकिंग कामकाजात डिजिटल पद्धतींचा जास्त वापर होत आहे. जवळपास बहुतांश कामकाज ऑनलाइन होत आहे. त्यामुळे कामकाज कमी वेळात होत आहे. लोकांना किरकोळ कामासाठी बँकेत चकरा माराव्या लागत नाहीत. सरकारनेही बँकिंगक क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
मार्च महिन्यात तब्बल ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पहा, कोणत्या दिवशी कुठे राहतील बँका बंद..?