Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

केंद्र सरकारने डाळींबाबत केलाय ‘हा’ मोठा दावा; घेतलाय मोठा निर्णय; जाणून घ्या, महत्वाची माहिती..

दिल्ली : केंद्र सरकारने दावा केला आहे, की तूर डाळीचे दर सुमारे तीन टक्क्यांनी खाली आले आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, साठा मर्यादा निश्चित केल्यामुळे आणि डाळींच्या आयातीवर करात सूट देण्यात आल्यामुळे डाळींच्या दरात घट झाली आहे. सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर आणि उडीद डाळ आयात करण्यास परवानगी दिली आहे.

Advertisement

ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार तूर डाळीच्या किमती 2.87 टक्क्यांनी घसरल्या आहेत. गेल्या वर्षी 22 फेब्रुवारीला तूर डाळ 9529.79 प्रति क्विंटल होती. तर यावर्षात 22 फेब्रुवारीला डाळींचा भाव 9255.88 रुपये प्रति क्विंटल आहे. किंबहुना, डाळींच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यापासून अनेक आवश्यक पावले उचलली आहेत.

Advertisement

डाळींची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने 15 मे 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर, उडीद आणि मूग आयात करण्यास परवानगी दिली होती. परंतु नंतर तूर आणि उडदाच्या आयाती संदर्भातील मोफत व्यवस्था 31 मार्च 2022 पर्यंत वाढ करण्यात आली. यासह सरकारने आयातदार आणि व्यापाऱ्यांना डाळींचा साठा जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.

Loading...
Advertisement

दरम्यान, या वर्षी म्हणजे 2022 मध्येही सतत वाढणाऱ्या महागाईपासून दिलासा मिळणार नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवरच होणार नाही, तर बाजारावरही त्याचा परिणाम होणार आहे. जेपी मॉर्गनच्या संस्थात्मक ट्रेडिंग क्लायंटच्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे, की या वर्षातही महागाईचा सर्वाधिक परिणाम जागतिक बाजारपेठेवर होईल.

Advertisement

जेपी मॉर्गन यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये हे सर्वेक्षण केले. यामध्ये सहभागी असलेल्या 718 संस्थात्मक ट्रेडिंग क्लायंटपैकी सुमारे 48 टक्के लोकांचे म्हणणे आहे, की या वर्षातील चलनवाढीचा सर्वाधिक परिणाम बाजारावर होईल. बाजाराची दिशा ठरवण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावेल. जगातील सर्वच देश महागाईने हैराण झाले आहेत. गतवर्षाच्या या सर्वेक्षणात या संकटाचा सर्वाधिक फटका बाजाराला बसल्याचे सांगण्यात आले होते.

Advertisement

आता 50 रुपये किलो मिळणार तूर डाळ.. पहा, कोणत्या राज्यात घेतलाय ‘हा’ दिलासादायक निर्णय

Advertisement
Advertisement

Leave a Reply