अर्र.. या वर्षातही कायम राहणार ‘हे’ संकट..! आम आदमीला दिलासा नाहीच; पहा, काय आहे अंदाज..?
मुंबई : या वर्षी म्हणजे 2022 मध्येही सतत वाढणाऱ्या महागाईपासून दिलासा मिळणार नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवरच होणार नाही, तर बाजारावरही त्याचा परिणाम होणार आहे. जेपी मॉर्गनच्या संस्थात्मक ट्रेडिंग क्लायंटच्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे, की या वर्षातही महागाईचा सर्वाधिक परिणाम जागतिक बाजारपेठेवर होईल.
जेपी मॉर्गन यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये हे सर्वेक्षण केले. यामध्ये सहभागी असलेल्या 718 संस्थात्मक ट्रेडिंग क्लायंटपैकी सुमारे 48 टक्के लोकांचे म्हणणे आहे, की या वर्षातील चलनवाढीचा सर्वाधिक परिणाम बाजारावर होईल. बाजाराची दिशा ठरवण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावेल. जगातील सर्वच देश महागाईने हैराण झाले आहेत. गतवर्षाच्या या सर्वेक्षणात या संकटाचा सर्वाधिक फटका बाजाराला बसल्याचे सांगण्यात आले होते.
या सर्वेक्षणात सामील असलेल्या 13 टक्के लोकांचा असा विश्वास आहे, की अर्थव्यवस्थेतील विस्कळीतपणा आणि कोरोना हे इतर घटक असतील, ज्याचा महागाईनंतर बाजारावर सर्वात मोठा परिणाम होईल. अलिकडच्या वर्षांत इलेक्ट्रॉनिक चॅनेलद्वारे व्यापारात प्रचंड वाढ झाली आहे. या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या सर्व मालमत्ता वर्गातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, की पुढील दोन वर्षांतही हाच ट्रेंड दिसून येईल.
जेपी मॉर्गनच्या स्कॉट वॉकरच्या मते, कोरोना संकटामुळे आम्हाला गेल्या दोन वर्षांत असामान्य परिस्थितीचा सामना करावा लागला. कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. बाजारातही अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत आपण इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगमध्ये मोठी वाढ पाहिली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 29 टक्के व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, मोबाइल ट्रेडिंग अॅप पुढील वर्षी बाजारात लक्षणीय परिणाम घडवून आणतील. मात्र, महागाई कमी होण्याची कोणतीच शक्यता सध्या दिसत नाही. आताही जे अहवाल येत आहेत, त्याद्वारेही महागाई कमी होणार नसल्याचेच सांगण्यात येत आहे.
.. तर ‘त्या’ संकटाचा भारतावरही होईल इफेक्ट.. पहा, महागाई कुठे-कुठे देणार झटका..