Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून बिल गेट्स यांनी केलेय भारताचे कौतुक; पहा, कोरोना लसींबाबत नेमके काय म्हटलेय त्यांनी..?

दिल्ली : अमेरिकन उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गिट्स यांनी जगभरात स्वस्त कोरोना प्रतिबंधक लस वितरीत केल्याबद्दल भारतीय लस निर्मात्यांची प्रशंसा केली आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी जगाला कोरोना व्हायरसपासून रक्षण करण्यासाठी लस उपलब्ध करून दिल्याबद्दल आरोग्य सेवा क्षेत्रातील अमेरिका आणि भारताच्या भागीदारीचे कौतुक केले आहे. संधू म्हणाले की, लसीद्वारे संपूर्ण जगाला कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षित करणे आश्चर्यकारक आहे.

Advertisement

भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या भारत-अमेरिका आरोग्य भागीदारी परिषदेत अब्जाधीश बिल गेट्स म्हणाले की, भारताने गेल्या एका वर्षात जवळपास शंभर देशांना लसीचे 15 कोटी डोस दिले आहेत. याबरोबरच त्यांनी भारतातील लस उत्पादक कंपन्यांचे आभार मानले आहेत. गेट्स म्हणाले की, कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. पण येणाऱ्या काळात आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहायला हवे. द्विपक्षीय भागीदारीतून जगाला स्वस्त लसी उपलब्ध होतील. वैज्ञानिक संशोधनातून नवीन शोधांमुळे उपचारासाठी नवनवीन उत्पादने वापरली जात आहेत. ही महत्त्वाकांक्षी भागीदारी प्रत्यक्षात साकारली जात आहे.

Advertisement

दरम्यान, देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी जगभरात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. अनेक देशात या घातक आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे या देशांतील परिस्थिती दिवसेंदिवस आधिकच खराब होत आहे. त्याच वेळी, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचे नवीन प्रकार, ओमिक्रॉन आल्यानंतर, जगभरात संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Loading...
Advertisement

आतापर्यंत जगभरात 42.13 कोटींहून अधिक लोक कोविड-19 च्या विळख्यात आले आहेत. तर कोट्यावधी लोक बरे सुद्धा झाले आहेत. त्याच वेळी, या आजारामुळे आतापर्यंत 58.7 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासा देणारी बातमी अशी आहे की, आतापर्यंत जगभरात 10.31 अब्ज लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले गेले आहे.

Advertisement

भारीच.. संयुक्त राष्ट्रसंघानेही केलेय भारताचे कौतुक; अर्थव्यवस्थेबाबत व्यक्त केलाय ‘हा’ अंदाज; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply