Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया-युक्रेन वादात वाढले भारताचे टेन्शन..! अमेरिका आणि रशिया दोघांनाही टाकलाय ‘हा’ डाव..

दिल्ली : सध्या युरोपमध्ये सामरिक परिस्थिती असताना जगाच्या नजरा आता आशियाच्या रणनितीवर आहे. विशेषतः रशिया आणि अमेरिका या जगातील दोन महासत्ता या परिस्थितीत भारत काय करणार, याकडे लक्ष ठेऊन आहेत. युक्रेनच्या मुद्द्यावर भारताने आपल्या बाजूने उभे राहावे अशी अमेरिकेची इच्छा आहे, मात्र रशियाने भारताबरोबरच्या आपल्या जुन्या मैत्रीचा हवाला दिला आहे. या परिस्थितीत भारताच्याही अडचणी वाढल्या आहेत. कारण, अमेरिका आणि रशिया या दोघांचीही नाराजी घेणे भारताला त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तर युक्रेन संकटात आतापर्यंत तटस्थ धोरण स्वीकारले आहे.

Advertisement

खरे तर युक्रेनच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या रशियाला सध्या अनेक मोठ्या आर्थिक आणि व्यावसायिक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. पाश्चात्य देश रशियावर एकापाठोपाठ एक निर्बंध टाकत आहेत. रशियाने भारताला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीतील रशियन दूतावासाने बुधवारी जारी केलेल्या व्हर्च्युअल प्रेस ब्रीफिंगमध्ये सांगितले की, ‘आम्ही आशा करतो की आमची भागीदारी सध्या आहे त्याच पातळीवर राहील. विशेषतः, डिसेंबर 2021 मध्ये नुकत्याच झालेल्या रशियन-भारतीय द्विपक्षीय शिखर परिषदेच्या निकालांवर एक नजर टाका. आम्ही संरक्षण क्षेत्रातील 10 वर्षांच्या सहकार्य कार्यक्रमावर स्वाक्षरी केली आहे. आमच्याकडे पाइपलाइनची मोठी योजना आहे. सर्व योजना यशस्वीपणे राबवल्या जातील असा आम्हाला विश्वास आहे.

Advertisement

युक्रेनच्या मुद्द्यावर आतापर्यंत तटस्थ राहिलेल्या भारताने अमेरिकेचे टेन्शनमध्ये वाढ केली आहे. मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या मवाळ वक्तव्यावर अमेरिकेनेही आश्चर्य व्यक्त केले आहे. दुसरीकडे, अमेरिकन मॅगझिन इंटरनॅशनल अफेयर्सने भारताच्या या भूमिकेवर काळजी व्यक्त केली आहे. रशियाच्या युक्रेनवरील कारवाईचा निषेध होत असताना भारताने मात्र या मुद्द्यावर मौन बाळगले आहे, असे लेखात म्हटले आहे. वास्तविक, भारताने UNSC बैठकीत तटस्थ राहून सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक हे आपले प्राधान्य असल्याचे भारताने म्हटले होते.

Loading...
Advertisement

भारत एका बाजूने गेला तर त्याचा मोठा परिणाम होईल, असे अमेरिकन मासिकात म्हटले आहे. भारताने रशियाला पाठिंबा दिला नाही तर भविष्यात ते अमेरिकेबरोबर सहकार्यात वाढ करतील, हे स्पष्ट आहे. असे घडल्यास त्याचा रशियाशी असलेल्या जुन्या धोरणात्मक मैत्रीवर परिणाम होईल. अलीकडच्या काळात रशिया आणि चीनमधील संबंध अधिक घट्ट झाले आहेत, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत युक्रेनच्या मुद्द्यावर भारताला चीनला कधीही पाठिंबा द्यायचा नाही.

Advertisement

दरम्यान, रशियाचे आणखी एक वक्तव्य समोर आले आहे. रशियाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, डोन्त्स्क आणि लुहान्स्क यांना स्वतंत्र देश म्हणून घोषित केल्यानंतर आज या दोघांनीही रशियामध्ये अधिकृत मान्यता मिळण्यासाठी अर्ज केला आहे. अमेरिकेने सोव्हिएत रशिया सोडून देशांतर्गत हस्तक्षेप सुरू केला असून युक्रेनचा वापर त्याविरोधात केला जात असल्याचा आरोप रशियाने केला आहे.

Advertisement

रशिया-युक्रेनचा वाद.. पण, भडकणार देशातील खाद्यतेल; पहा, सूर्यफूल तेलास कसा बसणार झटका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply