जयपूर : देशातील 5 राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसशासित राजस्थान राज्यात राज्य सरकारने अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. गेहलोत यांनी वीज पुरवठ्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
आता 50 युनिट वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 150 युनिटपर्यंतच्या सर्व घरगुती ग्राहकांसाठी 3 रुपये आणि 150 ते 300 युनिट आणि त्याहून अधिक वीज ग्राहकांसाठी 2 रुपये देखील स्लॅबनुसार लाभ दिले जातील. यासाठी 4000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याबरोबरच अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्यावर विशेष भर दिला आहे.
या अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री चिरंजीवी योजनेतील लाभाची मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढ केली आहे. 50 कोटी खर्चून सायबर सिक्युरिटी सेंटर सुरू होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10 कोटी रुपये खर्च करुन रस्ते बांधले जाणार आहेत. ही रक्कम 5 कोटींवरून 10 कोटी करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 600 कोटी रुपये खर्च केले जातील.
लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 20 कोटी रुपये तरतूद केली आहे तर मोफत बियाणे देण्यासाठी 30 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 60 हजार 600 कोटींहून अधिक किमतीचे जलप्रकल्प मंजूर करणार. प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलिस स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. 500 पोलिस मोबाइल युनिट तयार करण्यात येणार आहेत, पोलिस अभय कमांडचे कॅमेरे 30 हजारांपर्यंत वाढ करण्यात येणार आहेत.
50 युनिट वीज मोफत मिळणार आहे. 150 युनिटपर्यंतच्या सर्व घरगुती ग्राहकांसाठी 3 रुपये आणि 150 ते 300 युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठी 2 रुपये आणि स्लॅबनुसार लाभ दिला जाईल. 100 कोटी खर्चून EWS विकास निधी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारची चालाकी..! ‘त्या’ सबसिडीत केलीय मोठी कपात; पहा, तुमच्या बजेटला कसा बसू शकतो फटका..?