Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खरेदी करताय..? ; मग, ‘या’ नेहमीच्या सवयी टाळाच; बजेट होईल सोपे, वाचतील पैसे

अहमदनगर : आपण दररोज काही ना काही खरेदी करत असतोच. त्यात जर ऑफर, सूट असे शब्द कानी पडले तर गरज नसतानाही खरेदी केली जाते. त्यामुळे बऱ्याचदा हे बजेट बिघडते सुद्धा. कधी भाव वाढल्याने तर कधी अनावश्यक वस्तू खरेदी केल्याने. त्यानंतर मात्र महागाई वाढली असे अनेकांना वाटते. मात्र, कधी-कधी सवयीमुळे लोक खरेदीमध्येही जास्त खर्च करतात.

Advertisement

जेव्हा आपण खरेदीसाठी निघतो तेव्हा आपण ते खूप सोपे समजतो. मात्र, बऱ्याचदा या खरेदीसाठी जास्त पैसे खर्च होतात. यावेळी आपल्या लक्षातही येत नाही. काही गोष्टी अशा आहेत, की त्या जर टाळता आल्या तर आपले खरेदीचे बजेट बिघडणार नाही. अनावश्यक खर्चही होणार नाही. चला तर मग, जाणून घेऊ अशा काही गोष्टी ज्या सहज टाळता येण्यासारख्या आहेत.

Advertisement

तुमच्या पगाराच्या अर्ध्याहून अधिक बचत आणि गुंतवणुकीसाठी पैशांचा उपयोग करा. हे बँकेत मर्यादित पैसे ठेवेल, जे आपोआप खर्च करणे थांबवेल. हे काम महिन्याच्या सुरुवातीलाच करा. महत्त्वाची बिले, घरगुती वस्तू आणि कामासाठी पैसे काढून, उरलेले सर्व पैसे SIP किंवा कोणत्याही मुदत ठेवीमध्ये ठेवा. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि हेच पैसे भविष्यात तुम्हाला मदत करतील.

Advertisement

प्रमोशनल ई-मेल, सेल अलर्ट यांना अनसब्सक्राइब (unsubscribe) करुन टाका. खरेदी कमी करण्याचा हा एक अतिशय उपयुक्त मार्ग आहे. या ई मेल आणि अलर्ट्सच्या माध्यमातून सेल आणि डिस्काउंटचे मेसेज येत राहतात, त्यामुळे आपण वेबसाइटला भेट दिली तर तेथे काही ना काही तरी खरेदी केली जातेच. त्यामुळे विनाकारण आपले पैसे खर्च होतात.

Loading...
Advertisement

अनेक वेळा जेव्हा आपण खरेदीसाठी शॉपिंग मॉलमध्ये जातो तेव्हा तेथील काही लोक नवीन गोष्टी कोणत्या आहेत, याची माहिती देतात. त्यामुळे सहाजिकच त्या वस्तू खरेदी कराव्याशा वाटतात. काही जण खरेदीही करतात. त्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो. या गोष्टी टाळता आल्या तर खर्चाचे बजेट बिघडणार नाही.

Advertisement

अनेकांना सवय असते की ते दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खरेदी करण्यासाठी पोहोचतात. ही सवय तुमच्या खिशाला भारी पडू शकते. जेव्हा तुम्ही हे करता, तेव्हा तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी तुम्ही खरेदी करता. असे केल्याने तुमचे मासिक बजेट बिघडू शकते. जर तुम्ही एक यादी तयार केली आणि एकाच वेळी खरेदी केली तर ते तुमच्यासाठी चांगले सिद्ध होईल.

Advertisement

किराणा खरेदी करताय..? मग ‘या’ नेहमीच्या सवयी टाळाच; खरेदीचे बजेट बिघडणार नाही..

Advertisement
Advertisement

Leave a Reply