Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price : आज सोने-चांदीचा ट्रेंड बदलला.. सोने खरेदीआधी चेक करा नवीन दर..

मुंबई : जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होत आहे. दोन दिवसांच्या तेजीनंतर आज मात्र सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज एप्रिल डिलीव्हरी गोल्ड दरात 0.31 टक्के घसरण झाली आहे. तर चांदीचे दरही 0.23 टक्क्यांनी कमी झाले आहेत. काल मंगळवारी सोने दर 0.76 टक्क्यांच्या तेजीसह ट्रेड करत होते. तर चांदीमध्ये काल 1.10 टक्क्यांची वाढ झाली होती. जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल, तर आता खरेदी करू शकता. जाणकारांनुसार, 2022 मध्ये सोन्याच्या किमती 52000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाऊ शकतात.

Advertisement

एप्रिल डिलीवरी सोन्याचा दर आज 0.31 टक्क्यांच्या घसरणीसह 50,170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. आज चांदी 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह 64,200 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.

Advertisement

याआधी मंगळवारी मात्र मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिल फ्युचर्स सोन्याचा भाव 0.82 टक्क्यांनी वाढला होता. त्याच वेळी, मार्च वायदा चांदीच्या किमतीत 1.22 टक्क्यांची वाढ नोंदली गेली होती. वाढता भू-राजकीय तणाव, सोन्या-चांदीची वाढती मागणी यामुळे मंगळवारी जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीने नऊ महिन्यांचा सर्वाधिक टप्पा गाठला होता.

Loading...
Advertisement

इतर वस्तूंमध्ये कच्च्या तेलाने सात वर्षांचा सर्वाधिक टप्पा गाठला. अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर निर्बंध लादण्याची धमकी दिली आहे. महागाई नियंत्रणात येत नसल्याने सोन्यात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, वेळोवेळी प्रॉफिट बुकिंग सुरू राहील. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यामध्ये सुधारणा झाल्यामुळे पुढील तीन-चार महिन्यांत ते $2000 च्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान सोन्याचा भाव 52 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Gold Price : आज सलग दुसऱ्या दिवशी सोने चमकले; सोने भाववाढीत ‘त्या’ संकटाने अशी केलीय मदत; जाणून घ्या.. नवे दर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply