मुंबई : देशात इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. MG Motors, Tata Motors, Mahindra आणि Hyundai सारख्या मोठ्या कार ब्रँडने या सेगमेंटमध्ये आधीच त्यांची उत्पादने सादर केली आहेत. तर मर्सिडीज-बेंझ, जग्वार, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार ब्रँडनेही स्वतःच्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. अगदी BYD ने देशात आपली E6 इलेक्ट्रिक MPV लाँच केली आहे. आणखी एक लक्झरी ऑटोमेकर व्होल्वो यावर्षी देशात आपल्या इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे.
देशात इलेक्ट्रिक कारची मागणी अनेक कारणांमुळे वाढत आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमती, केंद्र सरकार आणि अनेक राज्य सरकारे आणि त्यांच्या संबंधित ईव्ही धोरणांद्वारे देण्यात येणाऱ्या अनुदान यांचा समावेश आहे. या काही देशात विक्री होत असलेल्या इलेक्ट्रिक कार आहेत, याबाबत आधिक माहिती जाणून घेऊ या..
महिंद्रा ई-व्हेरिटो
महिंद्रा ई-व्हेरिटो ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक सेडान कार आहे. महिंद्रा ई-वेरिटो इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट सेडानची किंमत 12.3 लाख ते 13.1 लाख पर्यंत आहे आणि ती D2 आणि D6 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. हे EV फ्लीट ऑपरेटर आणि सरकारी एजन्सींसाठी उपलब्ध आहे. परंतु वैयक्तिक खरेदीदारांसाठी नाही. ही कार एकाच चार्जवर 181 किमीची रेंज ऑफर करते, जी अन्य इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत खूप कमी आहे.
Tata Nexon EV
ही कार देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. Tata Motors ने दावा केला आहे, की जानेवारी 2020 मध्ये लाँच झाल्यापासून कंपनीने Nexon EV चे 13,500 युनिट्स विकले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देशात उपलब्ध असलेल्या सर्व इलेक्ट्रिक कारमध्ये इलेक्ट्रिक SUV सातत्याने सर्वोत्तम विक्री कामगिरी नोंदवत आहे. Nexon Ev त्याच्या मानक आवृत्तीप्रमाणेच डिझाइनसह येते. Nexon EV एका चार्जवर 312 किमीची रेंज देते.
BYD e6
ही कार 29.6 लाख (एक्स-शोरूम) किंमतीत येते. BYD e6 ही चिनी कंपनीची प्रीमियम ऑल-इलेक्ट्रिक MPV आहे. हे 70 kWh इलेक्ट्रिक मोटरद्वारे 180 Nm टॉर्क आणि 130 kmph चा टॉप स्पीड मिळवते. BYD e6 देखील एका चार्जवर तब्बल 500 किलोमीटर रेंज असल्याचा दावा करते.
Hyundai Kona EV
Hyundai Kona EV देशातील पहिली इलेक्ट्रिक SUV म्हणून लाँच करण्यात आली. Hyundai Kona EV 452 किलोमीटरती रेंज देते. जी देशतील बाजारपेठेतील इलेक्ट्रिक कारमध्ये सर्वाधिक आहे. SUV ची स्पर्धा Tata Nexon EV आणि MG ZS EV सारख्या कारबरोबर आहे. तथापि, या कारची किंमत 23.79 लाख आणि 23.97 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या दरम्यान आहे.
वाव.. फक्त 580 रुपयांत तब्बल 1000 हजार किलोमीटर.. पहा, ‘ही’ आहे टाटाची जबरदस्त इलेक्ट्रिक कार..