मुंबई : देशात कोरोनाचे संकट कायम असताना नागरिक महागाईने हैराण झाले आहेत. इंधनाचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे देशांतर्गत महागाईत वाढ झाली आहे. मागील दीड महिन्यांपासून मात्र इंधनाचे भाव वाढलेले नाहीत. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. कारण, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ होत आहे. तसेच देशातील तेल कंपन्याही दर कमी करण्याच्या मूडमध्ये नाहीत. अशी परिस्थिती असताना देशातील एका शहराने मात्र नागरिकांना नवीन वर्षानिमित्त खुशखबर दिली आहे. होय, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 2 टक्के सूट मिळणार आहे.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मतदान करणे आवश्यक आहे. सध्या लखनऊमध्ये पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. लखनऊ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने सांगितले की, राज्याच्या राजधानीत मतदान केल्याचे सांगितल्यानंतर लोकांना डिझेल-पेट्रोलवर 2 टक्के सूट मिळेल. पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, लोकांना सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत ही सूट मिळेल. या उपक्रमास लोकांनी प्रतिसाद दिला तर त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यास मदत होईल. म्हणजेच बुधवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत पेट्रोल आणि डिझेल भरण्यावर लोकांना हा फायदा मिळणार आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी 23 फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात पिलीभीत, खेरी, हरदोई, उन्नाव, लखनऊ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर येथे मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांतील 59 जागांवर मतदान होणार आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी या तीन टप्प्यातील मतदान झाले आहे. आता उद्या म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च या टप्प्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल घोषित होणार आहेत. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दोन टप्प्यात मतदान होईल. त्यानंतर 10 मार्च रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत.
भाजपने पाडलाय आश्वासनांचा पाऊस.. पहा, काय-काय मिळणार मोफत..?