Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशातील स्मार्टफोनवाले लवकरच होणार 1 अब्ज; जाणून घ्या, काय आहे नेमके कारण..?

मुंबई : जगभरात स्मार्टफोनधारकांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. भारतात तर अन्य देशांच्या तुलनेत स्मार्टफोन धारकांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. सन 2026 पर्यंत देशात एक अब्ज स्मार्टफोन वापरकर्ते असतील. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या डेलॉयटच्या अहवालानुसार, ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेने सुसज्ज असलेल्या स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाल्याने स्मार्टफोनधारकांची संख्या वाढेल.

Advertisement

सन 2021 पर्यंत भारतात 1.2 अब्ज मोबाइल फोन वापरकर्ते होते. यापैकी 75 कोटी लोक स्मार्टफोन वापरतात. डेलॉयटच्या 2022 ग्लोबल TMT (तंत्रज्ञान, मीडिया आणि मनोरंजन, दूरसंचार) अंदाजानुसार, “देशांतर्गत स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांची संख्या 2026 पर्यंत एक अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

Advertisement

डेलॉयटच्या मते, 2021 ते 2026 दरम्यान, ग्रामीण भागातील स्मार्टफोन ग्राहकांची संख्या वार्षिक आधारावर सहा टक्के दराने वाढेल. त्याच वेळी, शहरी भागात ते वार्षिक 2.5 टक्क्यांनी वाढेल. भारतातील स्मार्टफोनची मागणी 2021 मध्ये 30 कोटींवरुन 2026 मध्ये 6 टक्क्यांनी वाढून 40 कोटी होईल. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, युवकांवर केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की युवकांना इंटरनेट कनेक्शन मिळणे जास्त महत्वाचे आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, सॅमसंग, हुवावे, एलजी यांसह अन्य आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांनी 6G नेटवर्कवर काम याआधीच सुरू केले आहे. एका अहवालानुसार, 6G तंत्रज्ञानामध्ये इंटरनेटचा वेग 5G च्या तुलनेत तब्बल 50 पट जास्त राहण्याची शक्यता आहे. सन 2028 ते 2030 पर्यंत हे तंत्रज्ञान बाजारात आलेले असेल, असे अहवालात म्हटले आहे. देशात सध्या 5G तंत्रज्ञानावर ट्रायल सुरू आहे. हे तंत्रज्ञान अद्याप देशात लाँच केलेले नाही. असे असताना सरकारने आता 6G तंत्रज्ञानासाठीही चाचपणी सुरू केली आहे.

Advertisement

आजमितीस देशात 4G तंत्रज्ञान वापरात आहे. 5G तंत्रज्ञान अजून आलेले नाही. हे तंत्रज्ञान येण्याआधीच सरकारने 6G तंत्रज्ञानाचा विचार का सुरू केला आहे, असा प्रश्न केला जात आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे, सरकारने असा निर्णय घेतला आहे, की 6G तंत्रज्ञानाच्या बाबतीत अन्य देशांच्या कंपन्यांच्या तुलनेत भारत मागे राहू नये. त्यामुळे या कामकाजात आता आधिक उशीर करणे योग्य नसल्याचे सरकारला वाटत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेत 6G तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्राथमिक कार्यवाही सुरू केली आहे.

Advertisement

.. म्हणून Jio-Airtel ने सरकारच्या ‘त्या’ धोरणास केलाय विरोध.. सुपरफास्ट इंटरनेटच्या अडचणी वाढल्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply