Airtel देतोय Tata ला जोरदार टक्कर..! पहा, तुमच्यासाठी कोणता ब्रॉडबँड प्लान ठरेल बेस्ट..
ओमुंबई : टाटा प्ले फायबर (Tata play fiber) आणि एअरटेल एक्स्ट्रीम फायबर (Airtel Extreme Fiber) सारख्या कंपन्या त्यांच्या ब्रॉडबँड प्लॅनद्वारे अनेक फायदे देत आहेत. टाटा स्काय फायबरचे नाव बदलून आता टाटा प्ले फायबर असे करण्यात आले आहे. दोन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना 200mbps ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करतात. येथे आम्ही तुमच्यासाठी या दोन्ही कंपन्यांच्या योजनांची तुलना करणार आहोत.
टाटा प्ले फायबरच्या 200mbps ब्रॉडबँड प्लानची किंमत 1150 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दर महिन्याला 3.3TB डेटा दिला जातो. याबरोबरच कंपनी राउटरही मोफत देत आहे. तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे इन्स्टॉलेशन शुल्क (installation charges) आकारले जात नाही, परंतु यासाठी तुम्हाला किमान 3 महिन्यांचा प्लॅन एकत्र घ्यावा लागेल. प्लॅनमध्ये, तुम्हाला फिक्स्ड-लाइनद्वारे व्हॉईस कॉल कनेक्शन देखील दिले जाते, ज्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरच्या ब्रॉडबँड प्लॅन जो दरमहा 200 एमबीपीएस स्पीड देतो, त्याची किंमत 999 रुपये आहे. स्वस्त असण्याव्यतिरिक्त, तुम्हाला त्यात OTT फायदे देखील मिळतात. एअरटेल एक्स्ट्रीम फायबर प्लानमध्ये तुम्हाला Amazon Prime, Wink Music सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 3.3TB डेटासह फिक्स्ड-लाइन व्हॉईस कॉल कनेक्शन देखील दिले जाते.
साहजिकच, या दोन योजनांपैकी, तुम्हाला Airtel Extreme Fiber योजना अधिक परवडणारी वाटेल. एअरटेलच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अतिरिक्त OTT फायदे देखील मिळतात. रिलायन्स जिओ फायबरमध्ये सध्या 200 एमबीपीएस स्पीडसह कोणताही प्लान उपलब्ध नाही. या दोन्ही कंपन्यांच्या प्लानची तुलना केली तर एअरटेलचा प्लान आधिक फायदेशीर वाटतो. कारण, या प्लानमध्ये आणखीही काही फायदे मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही प्लान खरेदी करताना यांसह अन्य दूरसंचार कंपन्यांच्या प्लानची तुलना करुन तुमच्यासाठी जो प्लान बेस्ट असेल तो खरेदी करण्यास हरकत नाही.
वाव.. सगळे पैसे होतील वसूल..! 150Mbps स्पीड आणि 3.3TB डेटा; ‘या’ ब्रॉडबँड प्लानने केलीय कमाल..