Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आतापर्यंत 70 लाख पॉलिसीधारकांनी केलेय ‘हे’ महत्वाचे काम; 28 फेब्रुवारीपर्यंत आहे मुदत

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा IPO पुढील महिन्यात लाँच होणार आहे. या आयपीओबाबत पॉलिसीधारकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. म्हणजेच गेल्या काही दिवसांत खात्याबरोबर पॅन कार्ड अपडेट करणाऱ्यांची संख्या 60 ते 70 लाखांपर्यंत वाढली आहे. एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार म्हणाले की, एलआयसी पॉलिसीधारक कोट्याअंतर्गत आयपीओ अर्जासाठी पॅन क्रमांक अपडेट करणे अनिवार्य आहे. ज्यांनी हे महत्त्वाचे काम आजपर्यंत केले नाही, त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

एलआयसी आपला आयपीओ यशस्वी करण्यासाठी अशा पॉलिसीधारकांना मदत आहे, ज्यांच्याकडे डिमॅट खाते नाही. कुमार यांच्या मते, एलआयसीच्या सर्व कार्यालयांमध्ये पॉलिसीधारकांना पॅन क्रमांक लिंक करण्यात मदत केली जात आहे. ज्या पॉलिसीधारकांकडे डीमॅट खाती नाहीत, त्यांना मदत करण्यासाठी NSDL आणि CDSL यांना आवाहन केले आहे.

Advertisement

हे लक्षात घेण्यासारखे आहे की LIC च्या IPO मध्ये, 10 टक्के हिस्सा पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवला जाऊ शकतो, तर 5 टक्के हिस्सा कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवला जाऊ शकतो. बाजार नियामक सेबीकडे एलआयसीने सादर केलेल्या मसुदा दस्तऐवजांनुसार, असे स्पष्टपणे नमूद केले आहे की जर पॉलिसी धारकाने 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्याचा PAN अपडेट केला नाही तर त्यास आयपीओ घेता येणार नाही.

Loading...
Advertisement

LIC IPO अंतर्गत सरकार आपला 5 टक्के हिस्सा विकत आहे. एलआयसीमध्ये सरकारची 100 टक्के भागीदारी आहे, जी IPO नंतरही 95 टक्के राहील. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, LIC चा IPO 11 मार्च रोजी लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. यांसह, सरकार सुमारे $ 8 अब्ज उभे करेल. त्याचा प्राइस बँड 2000 ते 2100 रुपयांच्या दरम्यान ठेवता येईल.

Advertisement

LIC चा हा IPO आत्तापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. यामध्ये सरकार 5 टक्के स्टेक अंतर्गत 31.6 कोटी शेअर जारी करणार आहे. अहवालानुसार, त्यानुसार कंपनीचे मूल्य 5.4 लाख कोटी रुपये असेल. साधारणपणे विमा कंपनीचे मार्केट कॅप या मूल्याच्या चार पट असते. यानुसार, LIC चे बाजार मूल्य $288 अब्ज म्हणजेच सुमारे 22 लाख कोटी रुपये असेल आणि LIC ही देशातील सर्वात मोठी मूल्यवान कंपनी बनेल.

Advertisement

आतापर्यंत 50 लाख खातेदारांनी केलेय ‘हे’ महत्वाचे काम; वाचा, बातमी आहे महत्वाची..

Advertisement
Advertisement

Leave a Reply