Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता समुद्रातही टेलिकॉम कंपन्या आमने-सामने.. पहा, काय आहे Airtel-Jio चा प्लान..

मुंबई : समुद्रामध्ये फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याच्या योजनेत टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. या कामात Airtel आणि Jio सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या सहभागी होत आहेत. यासाठी, अनेक कंपन्यांचा एक गट तयार करण्यात आला आहे, जी जगातील सर्वात लांब सागरी केबल टाकण्याचे काम करेल. त्याची लांबी सुमारे 19,200 RKM (रूट किलोमीटर) असेल. अशा परिस्थितीत याचा फायदा काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सागरी केबल प्रणालीच्या विकासामुळे अनेक देश हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडले जातील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

जागतिक नेटवर्क क्षमतेचा विस्तार लक्षात घेऊन, देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेल एअरटेल एसईए-एमई-डब्ल्यूई-6 साठी समुद्रात केबल टाकणाऱ्या कंपन्यांच्या गटात सहभागी झाली आहे.  कंपनीने म्हटले आहे, की ती एक प्रमुख गुंतवणूकदार म्हणून कंसोर्टियममध्ये सहभागी होत आहे आणि केबल सिस्टममध्ये 20 टक्के गुंतवणूक करेल. हे नेटवर्क 2025 पासून कार्यरत होईल. युतीच्या इतर 12 सदस्यांमध्ये बांगलादेश सबमरीन केबल कंपनी, धिरागू (मालदीव), जिबूती टेलिकॉम, मोबिली (सौदी अरेबिया), ऑरेंज (फ्रान्स), सिंगटेल (सिंगापूर), श्रीलंका टेलिकॉम, टेलिकॉम इजिप्त, टेलिकॉम मलेशिया आणि टेलिन (इंडोनेशिया) या कंपन्यांचा समावेश आहे.

Advertisement

हे 19,200 RKM (रूट किलोमीटर) एसईए-एमई-डब्ल्यूई-6 सिंगापूर आणि फ्रान्सला जोडेल. जागतिक पातळीवर ही जगातील सर्वात लांब सागरी केबल प्रणाली असेल. एअरटेल एसईए-एमई-डब्ल्यूई-6 द्वारे त्यांच्या जागतिक नेटवर्कमध्ये 100 टेराबिट प्रति सेकंद (Tbps) क्षमता जोडेल. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडची (जिओ) पुढील पिढीची मल्टी-टेराबिट इंडिया-एशिया-एक्सप्रेस (IAX) समुद्राखालील केबल प्रणाली मालदीवला थेट सिंगापूर आणि भारताबरोबर जोडेल.

Loading...
Advertisement

दरम्यान, जिओ आणि एअरटेल या कंपन्या इंटरनेट आणि रिचार्ज प्लानमध्ये सध्या जोरदार स्पर्धा करत आहे. जिओ लवकरच देशातील तब्बल 1000 शहरांमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध करुन देण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे एअरटेलनेही जगातील दिग्गज टेक कंपनी गुगल बरोबर करार केला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या जमान्यात वेगाने बदल घडून येणार आहेत.

Advertisement

फक्त जिओच नाही तर ‘या’ कंपन्याही देतात दररोज 3GB डेटा.. पहा, तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट

Advertisement
Advertisement

Leave a Reply