Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price : आज सलग दुसऱ्या दिवशी सोने चमकले; सोने भाववाढीत ‘त्या’ संकटाने अशी केलीय मदत; जाणून घ्या.. नवे दर..

मुंबई : रशियाने पूर्व युक्रेनमधील दोन रशियासमर्थित फुटीरतावादी प्रदेशांना स्वतंत्र देश बनवण्याचे आदेश दिल्यानंतर युक्रेनचे संकट आणखी वाढले आहे. त्याचा परिणाम सोने मार्केटवर दिसून येत आहे. आज देशातील बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिल फ्युचर्स सोन्याचा भाव 0.82 टक्क्यांनी वाढला. त्याच वेळी, मार्च वायदा चांदीच्या किमतीत 1.22 टक्क्यांची वाढ नोंदली गेली. वाढता भू-राजकीय तणाव, सोन्या-चांदीची वाढती मागणी यामुळे मंगळवारी जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीने नऊ महिन्यांचा सर्वाधिक टप्पा गाठला.

Advertisement

जागतिक बाजारात स्पॉट सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी वाढून $1,909.54 प्रति औंस झाला. याआधी सोन्याने 1 जूनपासून सर्वाधिक टप्पा गाठला आहे. 1 जून रोजी सोन्याचा भाव प्रति औंस $1,913.89 होता. अमेरिकन सोन्याचे फ्युचर्स 0.7 टक्क्यांनी वाढून $1,913.60 वर पोहोचले.

Advertisement

मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिल फ्युचर्स सोन्याचा भाव 409 रुपये किंवा 0.82 टक्क्यांनी वाढून 50,487 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, मार्च फ्युचर्स चांदीचा भाव 766 रुपये किंवा 1.22 टक्क्यांनी वाढून 64,367 रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीचा भाव 0.9 टक्क्यांनी वाढून 24 डॉलर प्रति औंस झाला. तर प्लॅटिनम 0.9 टक्क्यांनी वाढून $1,083.68 वर आणि पॅलेडियम 0.8 टक्क्यांनी वाढून $2,406.24 वर पोहोचला.

Loading...
Advertisement

इतर वस्तूंमध्ये कच्च्या तेलाने सात वर्षांचा सर्वाधिक टप्पा गाठला. अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर निर्बंध लादण्याची धमकी दिली आहे. महागाई नियंत्रणात येत नसल्याने सोन्यात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, वेळोवेळी प्रॉफिट बुकिंग सुरू राहील. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यामध्ये सुधारणा झाल्यामुळे पुढील तीन-चार महिन्यांत ते $2000 च्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान सोन्याचा भाव 52 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

आज पहिल्याच दिवशी सोन्याने केलीय कमाल.. सोने खरेदीआधी चेक करा आजचे नवीन भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply