Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये ‘इतक्या’ दिवसात होतील पैसे दुप्पट.. पहा, काय आहेत योजनेचे फायदे..

मुंबई : जर तुम्ही आगामी काळात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये (saving schemes) ते करू शकता. या योजनांमध्ये तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळतो. तसेच यामध्ये गुंतवलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात. जर बँक डिफॉल्ट (bank default) असेल तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. परंतु पोस्ट ऑफिसमध्ये असे होत नाही. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये अगदी कमी रकमेतून गुंतवणूक सुरू करता येते. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये किसान विकास पत्र (KVP) देखील समाविष्ट आहे. चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ या..

Advertisement

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्रामध्ये सध्या वार्षिक 6.9 टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. व्याज वार्षिक आधारावर चक्रवाढ केले जाते. या अल्पबचत योजनेत गुंतवलेली रक्कम 124 महिन्यांत म्हणजे 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते. किसान विकास पत्रामध्ये किमान 1000 रुपये गुंतवले जाऊ शकतात. या योजनेत रु. 100 च्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. जास्तीत कितीही पैसे गुंतवणूक करता येते, तसे काही बंधन नाही.

Loading...
Advertisement

या लहान बचत योजनेत, एक प्रौढ किंवा जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती एकत्र खाते उघडू शकतात. या व्यतिरिक्त, लहान मुलांचे पालक त्यांच्या नावाने खाते उघडू शकतात तसेच या योजनेत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती स्वतःच्या नावानेही खाते उघडू शकते. किसान विकास पत्र योजना काही विशिष्ट परिस्थितीत मुदत पूर्ण होण्याच्या आत कधीही बंद केली जाऊ शकते. याशिवाय न्यायालयाच्या आदेशानुसार खातेही बंद केले जाऊ शकते. याशिवाय, खाते जमा तारखेपासून 2 वर्षे आणि 6 महिन्यांनंतर बंद केले जाऊ शकते.

Advertisement

पोस्टातही सुरू करू शकता RD खाते; मिळेल चांगला परतावा, पैसही राहतील एकदम सुरक्षित..

Advertisement
Advertisement

Leave a Reply