मुंबई : उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी सांगितले की, भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात स्वाक्षरी केलेल्या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्राला चालना मिळेल आणि स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होईल. मुंबई येथे उद्योग प्रतिनिधींशी (business persons) संवाद साधताना गोयल यांनी त्यांना आश्वासन दिले की, भारत-यूएई व्यापार करारामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे (double farmers income) पूर्णपणे संरक्षण करण्यात आले आहे आणि त्यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्राला चालना मिळणे अपेक्षित आहे.
“या करारामुळे पुढील पाच वर्षांत कृषी उत्पादनांची निर्यात (agriculture export) $ 850 दशलक्षने वाढण्याची अपेक्षा आहे,” असे गोयल म्हणाले. ते म्हणाले की, या करारामुळे आखाती देशांमध्ये भारतीय उत्पादनांचा प्रवेश वाढेल. UAE ला सोन्यावरील सवलतीच्या शुल्कामुळे कच्च्या मालाची किंमत कमी होईल ज्यामुळे UAE ला निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. ते म्हणाले की 2023 मध्ये UAE मध्ये रत्ने आणि दागिन्यांची निर्यात अंदाजे $10 अब्ज असेल. अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) सरकारने देशातील शेतीच्या विकासाला हातभार लावणारा हा आणखी एक करार केला आहे. त्याचे नेमके कोणते फायदे पुढे येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
- फक्त 6 हजारांत एक एकर जमीन, तीही थेट चंद्रावर.. कशी खरेदी करायची, वाचा..!
- जमिनीचा जिवंतपणा तपासण्याचे सॉइलोमीटर हे क्रांतिकारी कीट https://bit.ly/34qANdx या लिंकवरून खरेदी करा..
- कांदा बाजार : मार्केट जोरात; पहा कुठे मिळतोय रु. 3770/Q चा भाव
- Poultry Farming Info: व्यवसायाची आहे ‘अशी’ परिस्थिती; वाचा कुक्कुटपालनाची माहिती