Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल पंपांवर खडखडाट.. पेट्रोल खरेदी करायलाही पैसे नाहीत.. चीनच्या कृपेने ‘येथे’ आलेय मोठे संकट..

दिल्ली : चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या श्रीलंकेच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी श्रीलंका सरकारने भारताकडे मदत मागितली आहे. भारतानेही इंधन आणि वित्त पुरवठा केला आहे. तरी देखील या देशासमोरील अडचणी कमी झालेल्या नाहीत. सध्या या देशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे राहिलेले नाहीत.

Advertisement

देशातील बहुतांश पेट्रोल पंपावर खडखडाट झाला आहे. परकीय चलन संपल्याने देशाच्या अर्थव्यवस्था अत्यंत खराब परिस्थितीत आहे. आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की इंधनाचे बिल देण्यासाठीही अमेरिकी डॉलर शिल्लक राहिलेले नाही. श्रीलंकेचे ऊर्जामंत्री उदय गम्मनपिला यांनी सांगितले, की इंधनाच्या दोन खेपा मिळाल्या आहेत. मात्र, पैसे देणे आम्हाला शक्य नाही.

Advertisement

मागील आठवड्यात सरकारी तेल कंपनी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सांगितले होते, की विदेशातून मिळणारे इंधनाचे बिल देण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत. सरकारद्वारे निश्चित केलेल्या किंमतीवर डिझेल विक्री केल्याने 2020 मध्ये सीपीसीला 41.5 कोटी डॉलरचे नुकसान झाले होते. देशात इंधनाच्या टंचाईमुळे पेट्रोल पंपांसमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इंधनाच्या किंमतीत वाढ करणे आहे, असे गम्मनपिला यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी वित्त पुरवठा करण्यासाठी भारताने तब्बल 50 कोटी डॉलर कर्ज देण्याची घोषणा केली आहे. हा करार अशा वेळी झाला आहे जेव्हा श्रीलंकेने अलीकडेच भारताच्या सरकारी मालकीच्या तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून 40 हजार टन पेट्रोल आणि त्याच प्रमाणात डिझेल खरेदी केले आहे. तरी देखील या देशाच्या अडचणी मिटलेल्या नाहीत.

Advertisement

दरम्यान, श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत महागाईचा भडका उडाला आहे. तर परकीय चलनाचा साठाही जवळपास रिकामा झाला आहे. या वाईट परिस्थितीत, श्रीलंका सरकारने 1.2 अब्ज डॉलर आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, श्रीलंकेवर हे संकट का आले याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर यासाठी चीन काही प्रमाणात जबाबदार असल्याचे मानले जात आहे. आता या देशाने या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि दिवाळखोरी होऊ नये, यासाठी सोन्याची विक्री सुरू केली आहे. असे करून हा देश आपल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement

चिन्यांचा कुटील डाव उघड : कर्जात अडकलेल्या `त्या` देशाला भारताने दिली इतकी अब्ज डॉलर मदत

Advertisement
Advertisement

Leave a Reply