Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दुचाकी खरेदीचा विचार करताय..? ; जाणून घ्या, कोणत्या नव्या दुचाकींची होणार एन्ट्री..?

मुंबई : कोरोनानंतर आता देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रात पुन्हा एकदा वेग येताना दिसत आहे. सेमी कंडक्टरच्या टंचाईचा मुद्दा सोडला तर वाहनांना मागणी वाढत आहे. सेमी कंडक्टर टंचाईमुळे वाहन कंपन्यांना मात्र अडचणी जाणवत आहेत. मात्र, तरीही कंपन्या नवीन वाहने लाँच करत आहेत. आताही वाहन कंपन्या लवकरच काही दमदार वाहने लाँच करणार आहेत. त्यामुळे या वर्षातही दुचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ होणे अपेक्षित आहे. Royal Enfield च्या Scram 411 आणि KTM RC 390 या 2022 मध्ये आगामी दुचाकींच्या यादीत आघाडीवर आहे. कंपनी या दुचाकी लवकरच लाँच करू शकते. त्यामुळे या वर्षात कोणत्या दुचाकी लाँच होणार आहेत, याबाबत आधिक माहिती घेऊ या..

Advertisement

Hunter 350 आणि Scram 411
रॉयल एनफिल्डची Scram 411 ही दुचाकी लवकरच लाँच होऊ शकते. यामध्ये तुम्हाला एकच इंजिन प्लॅटफॉर्म पाहायला मिळेल. कमी सस्पेन्शन किट आणि एक लहान फ्रंट व्हील मिळणे अपेक्षित आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात दुचाकी लाँच होऊ शकते. त्याच वेळी, त्याची किंमत 1.70 लाख ते 1.90 लाख रुपये असू शकते. Scram 411 नंतर Royal Enfield आपली नवीन Hunter 350 मोटरसायकल लाँच करेल. हे रॉयल एनफिल्डच्या Meteor 350 वर आधारित असेल.

Advertisement

Ducati Streetfighter V2
ही दुचाकी लवकरच देशातील मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते यामध्ये तुम्हाला 955cc मिळेल.

Loading...
Advertisement

KTM 390 Adventure आणि KTM RC390
ही दुचाकी अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येईल. अपडेटेड KTM 390 Adventure ही कंपनीची यावर्षाची पहिली दुचाकी असू शकते. नुकत्याच दिसलेल्या नवीन ड्युअल-टोन ट्रिममध्ये ही मोटारसायकल दिसण्याची शक्यता आहे. KTM RC200 आधीच लाँच करण्यात आली आहे. नवीन जनरेशन KTM RC 390 देखील लवकरच देशातील बाजारपेठेत लाँच करण्यासाठी सज्ज आहे. अपडेटनंतर ही दुचाकी नवीन आऊट डिझाइन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल आणि अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह लाँच केली जाईल.

Advertisement

दुचाकी खरेदीचा आहे प्लान ? जरा थांबा.. येतेय आणखी एक शानदार मोटारसायकल; पहा, काय आहेत फिचर

Advertisement
Advertisement

Leave a Reply